जळगाव (प्रतिनिधी) पोलिसांकडून वसतीगृहातील महिलांना आणि मुलींना कपडे काढून नाचवण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. ‘महिला वसतीगृहात पुरूष पोलीस जाऊ शकत नाही, तक्रारदार महिला वेडसर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलिसांनी कोणताही व्हिडिओ शूट केला नाही’, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
येथील महिला वसतिगृहातील अत्याचारप्रकरणी चार सदस्य समिती नेमून दोन दिवसात चौकशी करण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार केलेली चौकशी, जाबजबाबनुसार आज विधीमंडळात आज अहवाल सादर केला. यात पोलिस वसतीगृहात जावू शकत नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी व जाबजबाबातून आरोप केलेल्या प्रकारात कोणतेही तथ्य आढळलेले नाही. तसेच आरोप केलेली महिला वेडसर असून आरोपात कोणतेही तथ्य आढळलेली नाही असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अहवाल सादर केला. तसेच मंत्री यशोमती ठाकूर, आमदार नाना पटोले यांनी महिला वसतीगृहाची बदनामी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
जळगाव महिला वसतीगृहात महिला व मुलींना वस्त्र काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार महिलेने केली होती. याप्रकरणी विधिमंडळात विरोधाकांनी सत्ताधारींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होते. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसात उच्चअधिकाऱ्यांच्या समितीकडून चौकशी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जळगाव महिला वसतीगृह प्रकरणी आज विधिमंडळात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समितीने दिलेल्या अहवालात कोणतेच तथ्य नसल्याचे सांगितले.
बदनामी करण्यांवर गुन्हे दाखल करा
विधिमंडळात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तसेच आमदार नाना पटोले यांनी या प्रकरणी महिला वसतीगृहाचे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळ अशा बदनामी करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले…
जळगाव वसतीगृहातील मुलींना नग्न करून नाचायला लावले होते त्याच्या चौकशीसाठी ६ महिला अधिकाऱ्यांची समिती करण्यात आली होती. १७ महिला तिथे राहत होत्या. ४१ जणांची साक्ष घेतल्या. बातमी आली त्यात कोणतेही तथ्य नाही. रत्नमाला सोनार या महिलेने तक्रार केली होती. ती वेडसर असल्याची तक्रार तिच्या नवऱ्याने यापूर्वी केली आहे. तिथे एकही पोलीस उपस्थित नव्हता वसतीगृहात महिलांची डान्स आणि गरब्याच्या कार्यक्रम ठेवला होता. महिला वसतीगृह असल्याने तिथे पोलीस जाऊ शकत नाही. पोलीसांनी कोणताही व्हिडोओ केलेला नाही.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांनी देखील सबंधित प्रकरणात पोलिसांचा सबंध आढळून येत नसल्याचे म्हंटले आहे.