मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणामध्ये बुधवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. तिवारी यांनी लाच घेऊन अनिल देशमुख यांच्या वकिलाला कथित तपास अहवालाची प्रत लीक केल्याचा आरोप आहे.
गेल्या आठवड्यात सीबीआयच्या चौकशी अहवालाचे एक पान मीडियामध्ये लीक झाले होते, ज्यात अनिल देशमुख यांना कथितरित्या क्लीन चिट देण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लीक झालेल्या अहवालात, तपास अधिकाऱ्याने देशमुख यांच्याविरुद्धचा तपास बंद करण्याची शिफारस केली होती, असे म्हणत की, “कोणताही दखलपात्र गुन्हा केला नाही”. यानंतर पासून देशमुख यांच्या गटाने एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तपासाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे.
तपास अहवाल लीक झाल्यानंतर एजन्सीने सुरुवातीला देशमुख यांच्या जावयाची चौकशी केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर, डागाची आता चौकशी केली जात आहे. गेल्या आठवड्यात, तपास अधिकाऱ्याच्या शिफारशींविरोधात देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्याच्या अहवालानंतर, एजन्सीने सांगितले की, हा खटला उच्च न्यायालयाच्या आदेशाला प्रतिसाद म्हणून दाखल करण्यात आला आहे.