जळगाव (प्रतिनिधी) ग.स.सोसायटी जळगाव सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनु.जाती/जमाती मतदार संघातून सहकार गटाकडून अनिल वसंत सुरडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील, गटनेते अजबसिंग पाटील यांच्यासह समर्थकांनी गदी केली होती.
अनिल सुरडकर हे समाज कल्याण सभापतींचे स्वीय सहाय्यक तथा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष असून त्यांनी सहकार गटाकडून अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महेश पाटील, भाईदास पाटील, शैलेश राणे, कल्पना पाटील, कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी व मित्र परिवार जिल्हाभरातून उपस्थित होते. सुरडकर हे एका आदर्श शिक्षकांचे चिरंजीव आहेत. ते संघटनेच्या माध्यमातून शिक्षक व इतर कर्मचारी बंधु, भगीनी यांचे प्रश्न सोडवण्याचे कामकाज करत असतात. एका प्रमाणिक व सच्चा कार्यकर्तेच्यासोबत आहे. तसेच सहकार गटाच्या पाठीशी असल्याची ग्वाही मित्र परिवारासह संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली.