जळगाव (प्रतिनिधी) आदिवासी समाजाचे भगवान बिरसा मुंडा वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे भाजप व महानगराच्यावतीने वीर बिरसा मुंडा व संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण जिल्हाअध्यक्ष आ. सुरेश भोळे, खासदार उन्मेष दादा पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी सीमाताई भोळे, जिल्हा पदाधिकारी प्रदीप रोटे, रेखा ताई कुलकर्णी, प्रा भगतसिंग निकम, राजेंद मराठे, राहुल वाघ, महेश जोशी, मनोज भंडारकर, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, नगरसेवक अॅड. सुचीता हाडा, छायाताई सारस्वत, आघाडीचे अध्यक्ष प्रभाकर तायडे, प्रमोद वाणी, दीपक बाविस्कर, कुमार श्रीरामे, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी, व राहुल पाटील, संतोष बाविस्कर, अशफाक शेख, जळगाव ग्रामीणचे, गोपाल भंगाळे, अरुण सपकाळे, ललित बऱ्हाटे नाना पाटील, योगेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.