जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी विवेक ठाकरे याचा शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तर दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात धरम सांखला, विवेक ठाकरे, सुजित वाणीच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवार) निकाल येण्याची शक्यता आहे.
डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणीच्या, विवेक ठाकरे आणि धरम संखालाच्या जामीन अर्जावर न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे. तर सीए महावीर जैन जामीन अर्जावर २८ जानेवारी निकाल येणार आहे. तसेच शिक्रापूरच्या गुन्ह्यात अजय राठी या संशयित आरोपीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. दुसरीकडे आज पोलिसांनी काही कागदपत्र न्यायालयात जमा केली आहेत. या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सुनावणी सुरू आहेत. दरम्यान, फिर्याद रद्द व्हावी, यासाठी सीए महावीर जैन हायकोर्टात गेले होते. परंतू त्यावरही अद्याप सुनवाई सुरु झाली नसल्याचे कळते. आरोपींकडून अॅड. उमेश रघुवंशी हे कामकाज पाहत आहेत.