जळगाव (प्रतिनिधी) शहरात चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या महामार्गावर ठेकेदार जंडू कन्स्ट्रक्शन कंपनी आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाय योजना न करता कार्य करीत असल्याने अपघात होत असल्याची लेखी तक्रार फारूक शेख यांनी केली होती. त्यात भर म्हणजे बुधवारी रात्री १० वाजता पुन्हा सालार नगर जवळील महामार्गावर डिव्हाईडर मुळे सीताराम नामक तरुणाचा अपघात झाला. त्यामुळे रात्रीच पुनःश्च शेख यांनी जिल्हा अधिकारी व नही चे सिन्हा यांच्या कडे तक्रार केली होती.
नही, सल्लागार व ठेकेदार कंपनी ची पाहणी व ठेकेदारास सक्त सूचना
गुरुवारी सकाळी नही चे अभियंता, आर्वी कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट चे अभियंता अनुप कुमार, जंडू ठेकेदार चे प्रतिनिधी हरींदर सिग यांनी तक्रारदार फारूक शेख, नगर सेवक रियाझ बागवान, झिया बागवन, रिझवान जहागीरदार, सईद शेख, युसूफ हाजी, अक्रम देशमुख सह पाहणी ला सुरवात केली व ठेकेदारास आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
तीन दिवससात उपाय योजना करतो – ठेकेदार
सालार नगर जवळ स्पीड ब्रेकर, पुला जवळ व तांबापूर अँप्रोच रोड ची दुरुस्ती, डिव्हाईडर वर पीसीसी, रेफलेक्टर, कलरिंग, आवश्यक तिथे सुरक्षात्मक उपाय योजना करण्याचे मान्य केले.
समांतर रस्ते व अंडर पास हाच अपघातास प्रतिबंध करू शकतो – फारूक शेख
शहरातून जाणाऱ्या चौपदरी मार्गाला लागून समांतर रस्ते (सर्विस रोड) आवश्यक असून नही चे तपासणी अहवालात सुध्दा नमूद आहे. पण ते रस्ते व अंडर पास होत नाही तो पर्यंत अपघात थांबणार नाहीत. जीव मुठीत घेऊन महामार्गावर जावे लागेल व आपला जीव अथवा शरीराचा भाग गमवावा लागेल.
शाळा सुरू होताच सब अल्लाह के भरोसे
२७ जानेवारी पासून शाळा सुरू होत आहे. सालार नगर व अकसा नगर या महामार्गच्या दोन्ही बाजूस शाळा आहेत. दोन्ही बाजू कडून विद्यार्थी येतात ते कसे रोड क्रॉस करतील हा मोठा प्रश्न असून शाळा व्यवस्थापन, पालक, समाजसेवक व राजकीय पुढ्यारांनी सयुक्तपणे विद्यार्थी-महिला पालक यांचा अपघात होणार नाही. यासाठी एकत्रित बसून निर्णय घ्यावा असे आव्हान सुद्धा फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.