पुणे (वृत्तसंस्था) कोर्टातील सगळ्या केसेस चालवून न्याय मिळवून देतो असे आमिष दाखवून वकिलाने ३८ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. मागील जवळपास नऊ वर्षांपासून नराधम वकील पीडितेचं लैंगिक शोषण (lawyer raped married woman) करत होता.
नंदकुमार डिकोजी पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या ६४ वर्षीय नराधम आरोपीचं नाव आहे. तो पुण्यातील विजयनगर कॉलनी परिसरातील रिमझिम बंगल्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा धक्कादायक प्रकार 2013 पासून सुरू असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून फिर्यादी महिला आणि तिच्या पतीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू आहे. पतीसोबत वाद झाल्यापासून फिर्यादी महिला एकटी राहते. तिला कुणाचाही आधार नाही. अशात पतीसोबतच्या वादात न्याय मिळावा म्हणून पीडितेनं न्यायालयात काही खटले दाखल केले होते. संबंधित सर्व खटले न्यायालयान लढून न्याय मिळवून देतो, असं आमिष आरोपी वकिल नंदकुमार पाटील यानं दाखवलं होतं.
त्यानंतर आरोपीनं न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली पीडित महिलेवर अनेकदा जबरदस्तीने अत्याचार केले आहेत. गेल्या जवळपास ९ वर्षांपासून आरोपी पीडितेचं जबरदस्तीने लैंगिक शोषण करत होता. फिर्यादीच्या पाठीशी तिचं कुटुंबीय नसल्याचं पाहून आरोपीनं तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीक म्हटलं आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.