मुंबई (वृत्तसंस्था) मंत्रालयात बॉम्ब असल्याचं निनावी फोन पोलिसांना आल्यानं खळबळ उडाली आहे. या अज्ञात कॉलमुळे मंत्रालयाबाहेरील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या निनावी कॉलनंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आहे. बॉम्बशोधक पथकाकडून तिनही इमारती आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला जात आहे.
पोलिसांना आज दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा हा निनावी कॉल कंट्रोल रुमला आला. 9850050620 या नंबरवरुन कंट्रोल रुमला मंत्रालयात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आजूबाजूच्या मंत्रालयातील मुख्य आणि इतर ठिकाणी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. बॉम्बशोधक पथकानेही घटनास्थळी पाचारण करत शोध घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत.