मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. रायन थॉर्प असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आलेली आहे. यातील काही जामीनावर सुटले आहेत.
पॉर्न फिल्म्स निर्मिती रॅकेट प्रकरणात पोलिसांनी सोमवारी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केली. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पॉर्न फिल्म्स निर्मितीत राज कुंद्रा मुख्य सुत्रधार असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे म्हटलं होतं. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. रायन जॉन थार्प असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
रायन थार्प विरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायन थार्पचे थेट राज कुंद्रा याच्यासोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. रायनही पॉर्न चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी होता. दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.