जळगाव (प्रतिनिधी) दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीस (खरेदी-विक्रीची नोंदणी) येताना प्रत्येकाला कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी (‘RTPCR’ test) आता बंधन कारक नसणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राष्ट्रवादीचे स्वप्निल नेमाडे यांच्या मागणीला प्रतिसाद देत दस्त नोंदणीसाठी आता अँटीजन टेस्ट ग्राह्य धरली जाईल, असे आदेश दिले आहेत.
दस्त नोंदणीसाठी rt-pcr टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती. तसेच या चाचणी वैधता फक्त ४८ तास गृहीत धरली जाणार होती. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयाचे नोंदणीचे व्यवहार ठप्प होऊन, कार्यालय बंद झाले की काय? असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे दस्त नोंदणीस अँटीजन टेस्ट ग्राह्य धरली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. नेमाडे यांच्या या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी rt-pcr ऐवजी टेस्ट दस्त नोंदणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आता दस्त नोंदणीसाठी एमपी जनतेस ग्राह्य धरली जाणार आहे. जिल्हाधिकार्यांनी व्हाट्सअप मेसेजवरून केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल राष्ट्रवादीच्या स्वप्निल नेमाडे यांनी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांचे आभार मानले आहेत.