TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

४२ कोटींच्या कामांना मंजुरी, शहरातील विकासकामे मार्गी लागणार : महापौर भारती सोनवणे यांची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या विकासकामांसाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत २०१९ मध्ये ४२ कोटींच्या कामाला मंजुरी दिली होती. काही कारणास्तव मंजूर निधीतील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मक्तेदाराला कामांचे कार्यादेश देणे रखडले होते. जळगावच्या विकासासाठी माजी मंत्री आ. गिरीष महाजन, आ. सुरेश भोळे, आ. चंदूभाई पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठली असून मक्तेदार श्रीश्री एबीडब्ल्यू जेव्ही या मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून लवकरच पुढील विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, कुलभूषण पाटील, दिलीप पोकळे, चंद्रशेखर पाटील, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, भारत सपकाळे, गजानन देशमुख, कुंदन काळे, उत्तम शिंदे, इंद्रजीत राणे आदी उपस्थित होते.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

प्रमुख रस्त्यांची कामे आणि इतर विकासकामे मार्गी लागणार

४२ कोटींच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि इतर विकासकामे मिळून जवळपास ११७ कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. शहरात एकाच वेळी अनेक कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याने अनेक रखडलेली कामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

स्वतंत्र खात्यात ५.१० कोटी निधी वितरित

जळगाव मनपासाठी ४१.९५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यात शासनामार्फत प्रकल्पाच्या ७० टक्के म्हणजे २९.३६५ कोटींचे अनुदान असणार आहे. तसेच मनपाचा हिस्सा ३० टक्के म्हणजेच १२.५८५ कोटी असणार आहे. संपूर्ण योजनेच्या कामासाठी मनपाने बँकेत स्वतंत्र खाते उघडले असून मनपाने स्वतःच्या हिश्शातील ५.१० कोटींचा निधी त्या खात्यात वितरित करण्यात आला असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत वर्षभरात काम पूर्ण करावे

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील विकासकामांसाठी ४२ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली असून मक्तेदाराला कार्यादेश देखील निर्गमित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता रस्ते दुरुस्तीची कामे करणे अत्यंत आवश्यक असून रस्ते दुरुस्तीच्या कामांचा प्रथम प्राधान्यक्रमाने करणेबाबत मक्तेदाराला आदेश करावे, अशी विनंती महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच कामे पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षे असली तरी ती वर्षभरात पूर्ण करावी अशी विनंती महापौरांनी मक्तेदाराला केली असता शासनाकडून निधीची पूर्तता जशी होईल तसे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ७० कोरोनाबाधित, ५६ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आई-वडील बाजारात गेले, घरी परतल्यावर फोडला हंबरडा !

May 19, 2023

कोरोना योध्यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान, साई निर्मल फाउंडेशनचा उपक्रम

February 15, 2021

शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण विरोधात गायरान बचाव मंचतर्फे बुधवारी मूकमोर्चाचे आयोजन (व्हिडीओ)

November 13, 2021

भुसावळात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या !

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group