TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

यशाचा मंत्र... शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची - मिनल करनवाल

vijay waghmare by vijay waghmare
December 11, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – यशाची संकल्पना जास्तीत जास्त शालेय गुण मिळविणे हिच नाही तर त्यासोबत सकारात्मकता आणि जीवनमूल्ये देखील अत्यंत महत्त्वाची असतात. ती स्पर्धेच्या युगात मोलाची ठरतात. थॉमस एडिसन ने बल्बचा शोध लावला त्या आधी तो हजार वेळा अपयशी झाला होता, मात्र प्रयत्न करीत राहिल्याने तो यशस्वी झाला. विद्यार्थ्यानी प्रयत्न करत रहावे म्हणजे यशाने जीवन उजळून निघेल, असा मोलाचा सल्ला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उपस्थितांना दिला.

अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता आणि तंत्रज्ञानातुन व्यवसायीक मुल्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली. “आर्टिफिशियल तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी मानवी बुद्धी, संवेदना आणि भावभावनांची जागा ते कधीच घेऊ शकत नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी व्हावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.”

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित ‘फाउंडर्स डे’ च्या सुरवातीला सरस्वती वंदना सादर झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, माजी मंत्री सतिश पाटील, गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डॉ. भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची उपस्थिती होते. मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय सांस्कृतिक वारसा जपणारी आणि जागतिक दृष्टीवर आधारित अद्वितीय अशी अनुभूती निवासी शाळा आहे. यातील विद्यार्थ्यानी ताणपुरा, तबला, बासरी, गिटार या वाद्यांवर फ्युजन सादर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन झाले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धीमत्तेला चालना देणारे नाट्य, नृत्य, संगीत…

नॅशनल एज्यूकेशन पॉलिसीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. विशेष उल्लेखनीय ठरलेली नाटके ‘स्लो लाईफ अॅण्ड एआय’, ‘संज्ञानात्मक पूर्वग्रह आणि एआय’, ‘मेडिकेशन अँड एआय’ ‘आर्ट अॅण्ड ए आय’ आणि ‘मानवी नातेसंबंध आणि एआय’ या सर्वांनी तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा संगम प्रभावीपणे मांडला. व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रात ए आय च्या माध्यमातून होणारे बदल, मानवी संबंधांवर एआय चा प्रभाव यावर भाष्य करणारे नाटिका सादर झाली. अकापेला गीत व रोबोट नृत्याने उपस्थितांचे लक्ष्य वेधून घेतले. तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांमध्ये असलेली संशोधनशीलता आणि सामाजिक जाण प्रकर्षाने जाणवली. म्युझिकल योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

अनुभुती स्कुल ही शाळा नसुन एक कुटुंब आहे, नेतृत्वगुणासह आत्मविश्वास वाढवण्याचे काम शाळेत झाले असे माजी विद्यार्थी सार्थक मिश्रा व अंशिका गुर्जर (कमर्शियल पायट) यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील दीप्ती, श्रीमय, भक्ती, समृध्दी, विजेंद्र या विद्यार्थ्यांनी सचित्र पेटिंग साकारले. शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी वार्षिक उपक्रमांविषयी सांगितले. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी पलक सुराणा, श्रृती गर्ग, समृध्दी खंडेलवाल, कनक साबु, मुक्ती ओसवाल आणि अन्मय जैन यांनी सूत्रसंचालन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भर पावसात चोपडा तालुक्यातील माचल्या गावात पाण्याची टंचाई

August 6, 2024

दिव्यांगांना मदत करणे ही परमेश्‍वरी सेवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

July 27, 2021

शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार देणे फसवणूक नाही ; उच्च न्यायालयाकडून प्रियकाराची निर्दोष मुक्तता !

December 21, 2021

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची… ; निराश समर्थकांना पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन !

June 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group