TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एपीआय सचिन वाझे यांना अखेर अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.

मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे. एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. तिथे तब्बल १२ तास मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिली आहे. वाझे यांना रविवारी सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर कारमिखाइल रोडवर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाझे यांच्यावरील अटकेच्या कारवाईने एकच खळबळ उडाली असून हा राज्य सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. वाझे यांच्यावर या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. वाझे यांना निलंबित करून अटक करा अशीही मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आधी चौकशी मग शिक्षा असा पवित्रा घेत सरकारने वाझे यांची केवळ खात्यांतर्गत बदली केली होती. आता वाझे यांना एनआयएने अटक केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

दरम्यान, अंबानी यांच्या घराजवळ ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती त्या कारचा मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएस मार्फत सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यापाठोपाठ एनआयएने स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांची चौकशी सुरू केली होती. त्यामुळे संभाव्य अटक टाळण्यासाठी वाझे यांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असता वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे न्यायालयाने नकार दिला होता. प्रथमदर्शनी मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे दिसते असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले होते. दुसरीकडे वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू होती. मुंबईतील एनआयए कार्यालयात वाझे यांच्यावर एनआयएच्या पथकाने प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर रात्री उशिरा वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली होती.

अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर –

साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (४ नोव्हेंबर) करण्यात आला होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

नेमकं काय आहे प्रकरण

अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर, या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, या स्कॉर्पिओ कारचे मालक व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करून तत्काळ अटकेची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला होता. दहशतवाद विरोधी पथकानेही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विमानतळ सल्लागार समितीची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड शेपर्ड स्कुल चा SSC चा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

June 17, 2022

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरला हायकोर्टाचा पुन्हा जोरदार झटका ; अटकेचे संरक्षण काढले !

March 18, 2021

जळगाव : बेपत्ता परप्रांतीय मजूराचा निर्घुण खून ; घटनास्थळी आढळले पैंजण, मंगळसूत्र !

April 21, 2024

दुध संघ अपहार प्रकरण : जळगाव पोलिसांना अकोल्यातून मिळाले अत्यंत महत्वपूर्ण रेकॉर्ड !

November 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group