अलिबाग (वृत्तसंस्था) महाड व पोलादपूर तालुक्यात दि. २१ व २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी महापूराची परिस्थिती निर्माण झाली. या बाधित शहरांमध्ये व गावांमध्ये मोठया प्रमाणात जनजीवन विस्कळीत होवून पशूधन व खाजगी मालमत्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा वेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था / ट्रस्ट / फाऊंडेशन्स / सीएसआर कंपन्या / दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात सढळ हस्ते मदत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खालील खाते क्रमांक व पत्ता उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे, त्यांनी खालील बँक खात्यामध्ये निधी जमा करावा
•खात्याचे नाव :- जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी ( District Disaster Response Fund )
•बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया,मुख्य शाखा, अलिबाग ( State Bank of India, Alibag )
•बँक खात्याचा नंबर : – 38222872300
• IFSC Code : – SBIN0000308
तसेच ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे, त्यांनी खालील ठिकाणी मदत पोहोच करावी
•नगरपालिका प्रशासकीय इमारत, महाड •
संपर्क : उपविभागीय अधिकारी, श्रीमती प्रतिमा पुदलवाड, मोबाईल नंबर – 8698710704 / 8369785053, श्री.सुरेश काशीद, तहसिलदार, महाड, मोबाईल नंबर – 9921332695 / 9324551377