जळगाव (प्रतिनिधी) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चोपडा येथे सैध्दांतिक व प्रात्यक्षिक तासिका घेण्यासाठी निव्वळ तासिका तत्वावर शिल्पनिदेशक/निदेशक यांची तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करावयाची आहे. त्याकरिता विहित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांनी ८ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत अर्ज करावेत. असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चोपडा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
संधाता, विजतंत्री, ॲटो इलेक्ट्रीकल, गणित/चित्रकला निदेशक प्रत्येकी एक पदासाठी शैक्षणिक अर्हता संबंधित शाखेतील पदवी, पदविका/आयटीआय+सीटीआयटीएस/सीटीआय, सदरील व्यवसायाची शिक्षकीय पदाची पात्रता संबंधित व्यवसायाची शाखेप्रमाणे राहील, संबंधित क्षेत्राचा फक्त पुर्णवेळ कामकाजाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. या पदांकरीता अनुभव पदवीसाठी एक वर्ष, पदवीसाठी दोन वर्ष, आयटीआयसाठी ३ वर्ष व MSCIT असणे आवश्यक आहे. सैध्दांतिक प्रति तास रुपये २५० तर प्रात्यक्षिकासाठी प्रति तास १२५ रुपये मानधन अनुज्ञेय राहील,
सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेले, (चोपडा) ता. चोपडा, जि. जळगाव येथे अर्जासह ८ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता मुळ प्रमाणपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, प्राप्त अर्जापैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड झाल्यावर ईमेल/भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात येईल. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चोपडा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.