जळगाव (प्रतिनिधी) सैनिक मुलींचे वसतीगृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे असून या वसतिगृहात चौकीदार पद कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे. सदरचे पद हे २४ तास कामाचे असून दरमहा ८९११ रुपये इतके एकत्रित मानधन देण्यात येईल. या पदाकरीता ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या माजी सैनिक तसेच इतर नागरीक यांनी ५ ऑगस्ट, २०२१ च्या आत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात येऊन अर्ज सादर करावा.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२४१४१४ वर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.