जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव मार्फत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाव्दारे राबविण्यात येणारी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.० (PMKVY ३.०) च्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य प्रशिक्षण तद्नंतर कौशल्य प्रमाणपत्र व रोजगार/स्वयंरोजगार संधी प्राप्त होणार आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना विविध रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. तरी सर्व शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था यांनी पुढाकार घेऊन कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
इच्छुक १५ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ऑनलाईन पध्दतीने https://forms.gle/८yF३wwxxVUQyvx७f८ या लिंकव्दारे नोंदणी करावी. तसेच ऑफलाइन नोंदणीसाठी व योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९६०५ वर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.