जळगाव : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. दरम्यान, जळगाव ग्रामीणसाठी सतरा उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले आहेत.
छाननीत आलेल्या 22 अर्ज पैकी 20 अर्ज वैध ठरले त्यामुळे आता 18 पैकी 17 उमेदवार वैध ठरले आहेत. उमेदवारांची नावे खालील प्रमाणे
अनिता सुनील सोनवणे बहुजन समाज पार्टी, गुलाब बाबुराव देवकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, गुलाबराव रघुनाथ पाटील शिवसेना, मुकुंदा आनंद रोटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, किशोर मधुकर झोपे हिंदुस्तान जनता पार्टी, प्रवीण जगन सपकाळे वंचित बहुजन आघाडी, योगेश एकनाथ कोळी लोकतांत्रिक लोकराज्यम पार्टी,गुलाबराव रघुनाथ पाटील अपक्ष मुक्काम पोस्ट शेवगे तालुका पारोळा, निलेश सुरेश चौधरी अपक्ष, प्रतापराव गुलाबराव पाटील अपक्ष, प्रसाद लीलाधर तायडे अपक्ष, भगवान दामू सोनवणे अपक्ष, भरत देवचंद पाटील अपक्ष, मुकेश मूलचंद कोळी अपक्ष, शिवाजी महारु हटकर अपक्ष,सोनी संतोष नेटके अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वेद आहेत तर विशाल बाबुराव देवकर यांचा एकमात्र अर्ज अपात्र करण्यात आला.