TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘ग. स. सोसायटी’च्या स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्री महाजन यांची निवड

ग. स. कार्यकारी मंडळाच्या पहिल्याच सभेत यथोचित सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ‘ग. स. सोसायटी’ च्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज, दि. 29 मे 2022 रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सोसायटीच्या स्वीकृत संचालकांची अधिकृत निवड जाहिर करण्यात आली.

‘ग. स. सोसायटी’ च्या नवनिर्वाचित संचालकांची ही बैठक म्हणजेच सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची पहिलीच सभा होय. सोसायटीच्या अधिनियमानुसार सभेमध्ये दोन स्वीकृत संचालक स्वीकारण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने या सभेत सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत ‘ग. स. सोसायटी’चे ‘स्वीकृत संचालक’ म्हणून जळगाव शहराच्या प्रथम नागरिक, शिक्षिका तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्रीताई सुनिल महाजन यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

दरम्यान, मराठा समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.राम पवार यांची निवड आधीच जाहीर झाली होती. त्याअनुषंगाने आजच्या या सभेत महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासमवेत दोन्ही स्वीकृत संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील, महेश पाटील, भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश इंगळे, अजय देशमुख, विश्वास पाटील, मंगेश भोईटे, रागिणी चव्हाण, वाल्मिक पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन उपस्थित होते.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना, ‘ग.स. सोसायटी’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संपूर्ण संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याला कायम ठेवीत विश्वासास तडा जाणार नाही, तो नेहमी जपला जाईल, असा विश्वास देत, मुळात मी स्वत: शिक्षक असून या सोसायटीत जास्तीत जास्त सदस्य संख्या ही शिक्षकांचीच असल्यामुळे या सर्व सभासदांना न्याय देण्यासाठी नवनिर्वाचित सर्व संचालकांच्या निर्णया सोबत सदैव राहीन, अशी ग्वाही देत महापौर जयश्री महाजन यांनी यावेळी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.

स्वीकृत संचालक या पदाकरिता महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी ‘ग. स. सोसायटी’च्या प्रस्तावास मान्यता दिल्यामुळे, तो आमचा बहुमान आहे व यामुळे आमच्या संस्थेची प्रतिष्ठा वाढलेली आहे आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण अनुभवाचा आम्हास भविष्यामध्ये नक्कीच उपयोग होणार आहे. तसेच राम पवार हे ‘ग. स. सोसायटी’च्या निवडणूकीत आमच्या बरोबरीने सक्रीय होते. त्यांचे सामाजिक कार्य हे जिल्हाभर आहे. त्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवडले आहे, असे मत याप्रसंगी सोसायटी’चे अध्यक्ष उदय पाटील यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO मध्ये जायची गरज नाही ; जाणून घ्या..सरकारची नवी नियमावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

December 15, 2020

दुकानदाराच्या नावे बनावट ईमेल आयडी तयार करून महिलांच्या अंतर्वस्त्रांची होम डिलिवरी !

June 14, 2022

महिला शिक्षण दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा ३ जानेवारीला होणार गौरव

January 2, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2025 !

August 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group