जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसी) जिल्ह्यातील ६ ‘विशेष निमंत्रित’ सदस्यांची नियुक्तीचे आदेश आज शासनाच्या नियोजन विभागाने काढले आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने आज शासनाच्या नियोजन विभागाने पत्र जारी केले आहे. त्यानुसार माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, राजेश वानखेडे,रविंद्र पाटील,डॉ. सुरेश पाटील, घनश्याम अग्रवाल यांचा डीपीडीसीच्या ‘विशेष निमंत्रित’ सदस्यांमध्ये समावेश आहे. या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.