नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील भरत जगन्नाथ सैंदाणे यांचे सामाजिक क्षेत्रातील काम बघता त्यांची जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. आदिवासी कोळी महासंघ संस्थापक अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाददादा सोनावणे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
भरत सैंदाणे यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,माजी जी. प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव ग्रामीण क्षेत्रात अतिशय चांगले सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवत आहेत. सदर महसंघाच्या नियुक्तीने अजून कार्यकर्ते सक्रिय करून जास्तीत जास्त सामाजिक कार्य हाती घेऊ. आदिवासी बांधव व इतर समाज बांधवपर्यंत देखील महासंघात कार्यात सहभागी करून सर्वांची सेवा होईल, अशी कास धरू असे भरत सैंदाणे यांनी सांगितले. संपूर्ण मतदारसंघात जेथे जेथे शक्य असेल चांगले उपक्रम हाती घेण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे.












