जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी कडून नियुक्त जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्ष पदाच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.
त्यामध्ये जमील शेख शफी यांची जिल्हा सरचिटणीस प्रशासन, मनोज मानसिंग सोनवणे यांची सरचिटणीस, संघटन तर ज्ञानेश्वर कोळी यांची सरचिटणीस, जनसंपर्क तसेच तीन ब्लॉक अध्यक्ष नियुक्त केले असून भरत त्र्यंबक पाटील यांची बोदवड ब्लॉक, दिनेश सोपान पाटील यांची मुक्ताईनगर ब्लॉक, प्रदीप लिंबा पाटील यांची चोपडा तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कडून नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.