भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सोमनाथ वाघचौरे यांची बदली झाली आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच याबाबतचे आदेश काढले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अनधनियम, १९५१ च्या कलम २२ (न) मधील तरतुदीनुसार राज्य पोलीस सेवेतील पोलीस उप अधीक्षक /सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील खालील पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत असल्याचे आदेश म्हटले आहे. त्यानुसार डॉ. सुशीलकुमार नायक यांची उप-विभागीय पोलीस अधिकारी म्हणून गडचांदूर, चंद्रपूर येथे तर श्रीकांत डीसले यांची सहायक पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोमनाथ वाघचौरे यांना भुसावळ उप-विभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.