धरणगाव (प्रतिनिधी) मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देवून केली आहे.
शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारी नियमानुसार बांभोरी बु. शिवार व धरणगाव शिवार यास लागून असलेला 33 फुटाचा शेत पाणंद रस्ता बांभोरी बु. शिवारातील गट क्रं. 534 व धरणगाव शिवारातील गट क्रं. 628 पासून ते बांभोरी बु. शिवारातील गट क्रं. 551 व धरणगांव शिवारातील गट क्रं. 506 हिंगोणे बु. डांबरी रस्त्यापर्यंत शेत पाणंद रस्ता तयार करणे कामी. आम्ही सर्व ग्रामस्थ शेतकरी अर्जदार म्हणून खालील प्रमाणे संमती सह विनंती अर्ज करत असून अर्जासोबत तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडील अधिकृत नकाशा सोबत जोडून अर्ज करीत आहोत. तरी संबधित शेत पाणंद रस्त्यासाठी आपणाकडून मंजुरी देऊन आपल्या स्थरावर संबंधित अधिकाऱ्यांना योग्य तो आदेश देऊन. आम्हा सर्व अर्जदार शेतकऱ्यांचे शेतात जाण्या येण्याचे व शेत माल नेआण करण्याचे बाराही महिने होणारे हाल शेत पाणंद रस्ता तयार करून थांबवावे. असे यात म्हटले आहे.
निवेदनावर मोहन दिलीप पाटील, छोटू जाधव, नंदुलाल हिंमत पाटील, राहुल रवींद्र पाटील, संतोष कुंडलिक पाटील, श्रीकांत निंबा पाटील, सुशिलाबाई दिलीप पाटील, प्रकाश चिंधु पाटील, निलेश प्रकाश पाटील, रामदास पुंडलिक पाटील, विनोद रमेश पाटील, कल्पना वसंत पाटील, सुनंदाबाई रवींद्र पाटील, भागवत कांतीलाल मराठे, भागवत भगवान चौधरी, युसुफ शेख जाफर, नामदेव पिंताबर महाजन, आनंदा निंबा चौधरी, अनिता अनिल पाटील, राकेश निंबा सोनार, भाऊराव केशव पाटील, गणेश वसंत पाटील, सरस्वताबाई पुंडलिक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.