मुंबई (वृत्तसंस्था) उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. एका मुख्यमंत्र्याने असे विधान करणे हे शोभा देत नाही. या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी काहीही बोलण्याआधी विचार करायला हवा. आजच्या युगात तुम्ही असे काही बोलता. आता लोकांच्या कपड्यांवरून तुम्ही त्यांची संस्कृती ठरवणार आहात का? ही एक घाणेरडी विचारवृत्ती आहे आणि यामुळे महिलांवरच्या अत्याचारात वाढ होतेय, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली.
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या रिप्ड जीन्सबद्दल विधान केले आणि फसले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिने महिलांच्या रिप्ड जीन्सबद्दल बोलणा-या तीरथ सिंह रावत यांना सणसणीत उत्तर दिले होते. आता नव्या नवेलीची आजी आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनीही तीरथ सिंह यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. एका मुख्यमंत्र्याने असे विधान करणे हे शोभा देत नाही. या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी काहीही बोलण्याआधी विचार करायला हवा. आजच्या युगात तुम्ही असे काही बोलता. आता लोकांच्या कपड्यांवरून तुम्ही त्यांची संस्कृती ठरवणार आहात का? ही एक घाणेरडी विचारवृत्ती आहे आणि यामुळे महिलांवरच्या अत्याचारात वाढ होतेय, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली.
काल जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. शिवाय रिप्ड जीन्स घातलेला एक फोटो शेअर केला होता. ‘ Wtf, आमचे कपडे बदलण्याआधी आपले विचार बदला. मी रिप्ड जीन्स घालणार आणि अभिमानाने मिरवणार,’ असे नव्याने तिच्या इन्स्टास्टोरी पोस्टमध्ये लिहिले होते.
दरम्यानं, सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचे म्हटले. ‘माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे,’ असे रावत यांनी म्हटलं आहे.