जळगाव (प्रतिनिधी) सुवर्ण कारागिरांचे दुकाने असलेल्या कॉम्पलेक्समधील दोन दुकानांमध्ये शस्त्रास्त्र दरोडा टाकून तेथून २५२ ग्रॅम वजनाचे सुमारे १४ लाख ५९ हजार रुपयांचे सोने जबरीने चोरुन नेल्याची खळबळजनक घटना दि. २६ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मारोतीपेठ परिसरात घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
शहरातील मारोतीपेठ परिसरात सिताराम प्लाझा नावाचे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये बहुतांश घरे ही सुवर्ण कारागिरांची असून त्याठिकाणी ते सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करतात. या अपार्टमेंट मधील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सचिन प्रभाकर सोनार (वय ३८, रा. रामपेठ) यांचे श्री अलंकार नावाने दागिने बनवण्याचे दुकान आहे. तर दुसऱ्या मजल्यावर शेख जोसीमोद्दीन बशीरोद्दीन यांचे नूर पॉलिश छिलाई सेंटर नावाचे सोने पॉलिशचे दुकान आहे. दि. २२ जानेवारी रोजी शहरातील एका नामांकित सुवर्ण पेढीकडून सचिन सोनार यांच्याकडे १७३.७९९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दागिने घडविण्यासाठी दिली होती. त्यातून काही दागिने तयार करून दिले तर काही तयार करणे बाकी होते. त्यानंतर दि. २५ जानेवारी रोजी सोनार हे नातेवाइकांसह चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे गेले होते. त्यावेळी दुकानात त्यांचा मावस भाऊ व कारागीर दागिने घडविण्याचे काम करीत होते.
पहाटे चार चाजेच्या सुमारास चार जणांचा घरात प्रवेश !
नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास ते सुवर्ण कारागिरांच्या घरात दूकान बंद करून घरी गेल्यानंतर पहाटे साडेतीन ते चार चाजेच्या सुमारास चार जणांनी सोनार यांच्या दुकानाचे लोखंडी गेट व चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, चोरट्यांनी दुकानात ठेवलेले ८ लाख ६९ हजार ३७४ रुपये किमतीचे १५०.०३० चजनाचे सोन्याचे कच्चे मटेरिअल घेवून चोरटे पसार झाले. दुसऱ्या मजल्यावरील पॉलीशच्या दुकानात झोपलेल्या कारागिरांना चोरी करतांना चोरट्यांनी धमकाविले. यावेळी त्यांच्या हातात लोखंडी रॉड, कटरी आणि चाकू आणि बंदूकीसारखे घातक शस्त्र असल्याचे देखील त्या कारागिराने सांगितले. दुकानात अंधार असल्यामुळे मात्र ते स्पष्ट न दिसल्याचे कारागिरांनी सांगितले.
सोने घेवून चोरटे पसार !
तिसऱ्या मजल्यावरील सोनार यांच्या दुकानातून चोरी केल्यानंतर चोरटे त्याच इमारतीमधील दुसन्या मजल्यावर असलेल्या शेख जोसीमोडीन यांच्या सोने पॉलिशच्या दुकानाचा दरवाजा कटरने तोडून दुकानात शिरले, याठिकाणी शेख मोहसीन व शेख मुश्ताकीन हे दोन बंगाली कारागीर झोपलेले होते. चोरट्यांनी शेख मोहसीन याच्या अंगावरील ब्लॅकेट काढून कोठे काय ठेवले आहे, अशी विचारणी केली. दरम्यान, बंगाली कारागिराने आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगतल्यानंतर चोरट्याने त्याच्या तोंडावर ब्लॅकेट टाकून झोपून रहा, असे धमकावले व दुकानातील कारागिरांच्या ड्रॉवरमधून ५ लाख ९० हजार १५० रुपये किमतीचे १०१.७५० ग्रॅम वजनाचे सोने घेवून चोरटे पसार झाले.
गाढ झोपेत असलेल्या कारागिरांना लाथ मारुन उठविले !
रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत काम केल्यानंतर पॉलीशच्या दुकानात असलेले कारागिर झोपून गेले. गाढ झोपेत असलेल्या कारागिरांना चोरट्यांनी लाथ मारुन उठविले, त्याठिकाणून त्यांनी सोन्यासह त्या कारागिरांचे मोबाईल देखील चोरुन नेले. चोरटे पसार झाल्यानंतर कारागिर दुकानात आपल्या मोबाईलचा वेध घेत होते. मात्र मोवाईल मिळून न आल्याने चोरट्यांनी आपले मोबाईल देखील लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या कारागिरांनी दुसऱ्याचा मोचाईल घेऊन दुकानमालक व सचिन सोनार यांनाही या चोरीविषयी माहिती दिली. या प्रकरणी सचिन सोनार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रिया दातीर करत आहेत.