TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात सशस्त्र दरोडा ; सुवर्ण कारागिरांकडून १४ लाखांचे सोने लुटले !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सुवर्ण कारागिरांचे दुकाने असलेल्या कॉम्पलेक्समधील दोन दुकानांमध्ये शस्त्रास्त्र दरोडा टाकून तेथून २५२ ग्रॅम वजनाचे सुमारे १४ लाख ५९ हजार रुपयांचे सोने जबरीने चोरुन नेल्याची खळबळजनक घटना दि. २६ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मारोतीपेठ परिसरात घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

READ ALSO

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

शहरातील मारोतीपेठ परिसरात सिताराम प्लाझा नावाचे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये बहुतांश घरे ही सुवर्ण कारागिरांची असून त्याठिकाणी ते सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करतात. या अपार्टमेंट मधील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सचिन प्रभाकर सोनार (वय ३८, रा. रामपेठ) यांचे श्री अलंकार नावाने दागिने बनवण्याचे दुकान आहे. तर दुसऱ्या मजल्यावर शेख जोसीमोद्दीन बशीरोद्दीन यांचे नूर पॉलिश छिलाई सेंटर नावाचे सोने पॉलिशचे दुकान आहे. दि. २२ जानेवारी रोजी शहरातील एका नामांकित सुवर्ण पेढीकडून सचिन सोनार यांच्याकडे १७३.७९९ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दागिने घडविण्यासाठी दिली होती. त्यातून काही दागिने तयार करून दिले तर काही तयार करणे बाकी होते. त्यानंतर दि. २५ जानेवारी रोजी सोनार हे नातेवाइकांसह चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे गेले होते. त्यावेळी दुकानात त्यांचा मावस भाऊ व कारागीर दागिने घडविण्याचे काम करीत होते.

पहाटे चार चाजेच्या सुमारास चार जणांचा घरात प्रवेश !

नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास ते सुवर्ण कारागिरांच्या घरात दूकान बंद करून घरी गेल्यानंतर पहाटे साडेतीन ते चार चाजेच्या सुमारास चार जणांनी सोनार यांच्या दुकानाचे लोखंडी गेट व चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, चोरट्यांनी दुकानात ठेवलेले ८ लाख ६९ हजार ३७४ रुपये किमतीचे १५०.०३० चजनाचे सोन्याचे कच्चे मटेरिअल घेवून चोरटे पसार झाले. दुसऱ्या मजल्यावरील पॉलीशच्या दुकानात झोपलेल्या कारागिरांना चोरी करतांना चोरट्यांनी धमकाविले. यावेळी त्यांच्या हातात लोखंडी रॉड, कटरी आणि चाकू आणि बंदूकीसारखे घातक शस्त्र असल्याचे देखील त्या कारागिराने सांगितले. दुकानात अंधार असल्यामुळे मात्र ते स्पष्ट न दिसल्याचे कारागिरांनी सांगितले.

सोने घेवून चोरटे पसार !

तिसऱ्या मजल्यावरील सोनार यांच्या दुकानातून चोरी केल्यानंतर चोरटे त्याच इमारतीमधील दुसन्या मजल्यावर असलेल्या शेख जोसीमोडीन यांच्या सोने पॉलिशच्या दुकानाचा दरवाजा कटरने तोडून दुकानात शिरले, याठिकाणी शेख मोहसीन व शेख मुश्ताकीन हे दोन बंगाली कारागीर झोपलेले होते. चोरट्यांनी शेख मोहसीन याच्या अंगावरील ब्लॅकेट काढून कोठे काय ठेवले आहे, अशी विचारणी केली. दरम्यान, बंगाली कारागिराने आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगतल्यानंतर चोरट्याने त्याच्या तोंडावर ब्लॅकेट टाकून झोपून रहा, असे धमकावले व दुकानातील कारागिरांच्या ड्रॉवरमधून ५ लाख ९० हजार १५० रुपये किमतीचे १०१.७५० ग्रॅम वजनाचे सोने घेवून चोरटे पसार झाले.

 गाढ झोपेत असलेल्या कारागिरांना लाथ मारुन उठविले !

रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत काम केल्यानंतर पॉलीशच्या दुकानात असलेले कारागिर झोपून गेले. गाढ झोपेत असलेल्या कारागिरांना चोरट्यांनी लाथ मारुन उठविले, त्याठिकाणून त्यांनी सोन्यासह त्या कारागिरांचे मोबाईल देखील चोरुन नेले. चोरटे पसार झाल्यानंतर कारागिर दुकानात आपल्या मोबाईलचा वेध घेत होते. मात्र मोवाईल मिळून न आल्याने चोरट्यांनी आपले मोबाईल देखील लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या कारागिरांनी दुसऱ्याचा मोचाईल घेऊन दुकानमालक व सचिन सोनार यांनाही या चोरीविषयी माहिती दिली. या प्रकरणी सचिन सोनार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून अज्ञात चोरट्‌यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रिया दातीर करत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Next Post

सोनसाखळी चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड ; अकोला एलसीबीची कामगिरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : धरणगावातील राजकारण्यांना पडला पालिकेच्या १५६ व्या स्थापना दिनाचा विसर !

September 2, 2022

तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे २५ खेळाडू उत्तीर्ण !

May 29, 2023

सेन्सेक्स १२००, निफ्टी ४०० अंकांनी कोसळला ; गुंतवणूकदारांचे ५.२८ लाख कोटी रुपये बुडाले !

January 24, 2022

जळगाव : वीजपुरवठ्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वायरमनला रंगेहात अटक !

November 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group