TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणावर गोळीबार करणाऱ्याला मन्यारखेड्यातून एमआयडीसी पोलिसांनी केली शिताफीने अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या भांडणातून झालेल्या वादातून एकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केल्याची घटना काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (राजपूत, 25, गजानन पार्क, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आकाश प्रेम तंवर (वय २४, रा. गजानन पार्क, कुसुंबा ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता कंपनीत कामावर जात होता. त्यावेळी एमआयडीसी सेक्टर नंबर व्ही येथील प्रभा पॉलिमर कंपनी जवळ आकाश तंवर त्याचा मित्र रोहित पवार तसेच अनिल सैंदाणे, समाधान पाटील, भरत चांदवडे, धीरज पवार हे गप्पा मारत उभे होते. त्या ठिकाणी संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोपान चंदूसिंग मोरे हा त्याचे मित्र विपुल पाटील व अजय पाटील (दोन्ही रा. कुसुंबा) यांच्यासोबत आला आणि स्वप्नील आकाश तंवर याला म्हणाला की, बब्या कुठे आहे, त्याने तुझ्या सांगण्यावरून मला मारले आहे. आज तुमच्या दोघांचा गेम करतो. त्यावर आकाश तंवर याने, बाब्याबाबत मला काही माहिती नाही, असे सांगितले.

READ ALSO

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

मात्र, त्याचे वाईट वाटून स्वप्नील मोरे याने कमरेला लावलेला बंदूक कट्टा काढून आकाश तंवर याच्यावर रोखला. आधी तुझा मग नंतर बब्याचा काम करतो, असे म्हणाला. त्यावेळी त्यांनी गोळी झाडली. पण आकाशने खाली वाकून गोळीचा नेम चुकवला आणि रस्त्यात पडलेला दगड उचलून संशयित स्वप्नील मोरे यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर स्वप्निल मोरे याने पुन्हा दुसरी गोळी आकाश तंवर याच्यावर फायर केली. ही गोळी आकाशच्या अंगाच्या जवळून गेली. नंतर पुन्हा तिसरी गोळी झाडत असताना त्याचे पिस्तूल अडकले. त्यामुळे घाबरून आकाश याने पुन्हा दुसरा दगड उचलून त्याच्यावर फेकत असताना स्वप्नील मोरे आकाश याच्या जवळ गेला. यानंतर त्याने डोक्यावर पिस्तुलाने मारले. नंतर आकाशच्या हातात दगड सापडल्याने तो पळून गेला.
ही घटना आकाश तंवरच्या मित्रांनी पाहिली. संशयित स्वप्नील मोरे यांच्यासोबत आलेले विपुल पाटील, अजय पाटील हे लगेच मोटरसायकल घेऊन त्याच्यामागे गेले आणि त्याला दुचाकीवर बसवून प्रभा पॉलिमर येथून निघून गेले. त्यानंतर आकाश तंवर याने त्याचा काका राजेश पवार यांना घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी त्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपानने तीन दिवसांपुर्वीच 16 हजार रूपयात गावठी कट्टा आणि तीन काडतूस खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार करणारा स्वप्नील हा मन्यारखेडा येथे आहे. माहीती मिळाल्यावर लागलीच मन्यारखेडा येथे गुन्हे शोध पथकाचे पोउनी दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधीर सावळे, इमरान सैय्यद, सचीन मुंढे, योगेश बारी, किशोर पाटील, सचीन पाटील, मुदस्सर काझी, मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंढे, महिला पोना निलोफर सैय्यद अशांनी जावून त्याला मन्यारखेडा फाट्याजवळून ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले असून व त्याच्या अंगझडतीमध्ये त्याने गुन्हयात वापरलेले २० हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा आणी एक जिवंत काडतुस काढून दिलेले आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असुन गुन्हयाचा तपास पोउनी दिपक जगदाळे, योगेश बारी हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
Next Post

शेतमालकाकडून महिला मजुरांना अश्लिल शिवीगाळ ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तर ‘त्यांचा’ आता ‘राम नाम सत्य’ होईल’ – योगी आदित्यनाथ यांचा गंभीर इशारा

November 1, 2020

प्राचार्य काटे दांपत्यासह मुलीचा दिल्लीत सत्कार

August 18, 2021

‘अतिरेक्यांनी पैसे पाठवले, तुम्हाला अटक होईल’ म्हणत 20 लाखांचा गंडा !

September 26, 2025

महावितरणकडून वीजपुरवठ्याची उच्चांकी झेप ; तब्बल २३०७५ मेगावॅटचा विक्रमी वीजपुरवठा

February 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group