चोपडा (प्रतिनिधी) आचार्य विद्यासागरजी महामुनीश्री यांचे दीक्षा समयीचे दीक्षार्थीगुरू बंधू आचार्य कल्प श्री विवेकसागरजी महामुनीश्रींचे परम शिष्य आर्यिका विज्ञानमती माताजी (साध्वी )सहसंघांचे मांगीतुंगी सिद्धक्षेत्राकडून ११ माताजी व १० दीदी असे २१ त्यागी घेऊन तपस्वीवृंदांचे कुसुंबा गौरव असलेल्या तपस्वी धर्मनगरीत दिनांक २ मार्च वार शनिवार रोजी सकाळी ८ वाजता शुभ आगमन होणार आहे.
यामुळे कुसुंब्यात धार्मिक नाविन्य चैतन्य वातावरणाने भाविकात उत्साह संसारलेला आहे .प.पु आर्यिका विज्ञानमती माताजी सहसंघाचे दीक्षा घेतल्यानंतर प्रथमच कुसुंब्यात आगमन होत आहे. त्यानिमित्त त्यांचे भव्य स्वागत व नगरातून विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यासाठी भाविकांनी दिनांक २मार्च वार शनिवार रोजी सकाळी ठीक ८वाजता हिरासन पुला जवळ बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश जैन समाजाचे प्रसिद्ध प्रमुख व खान्देश पत्रकार आणि कुसुंबा प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त श्री.सतीश वसंतीलाल जैन आणि श्री. महेंद्र हिरालाल जैन यांनी केले आहे .स्वागत मिरवणूक नगरातील विविध मार्गावरून प्राचीन जैन मंदिराजवळ विसर्जित होईल. तेथे पूज्य माताजी आर्यिका विज्ञानमती माताजी यांचे आशिर्वादत्मक प्रवचन होईल. व नंतर आहार विधी ,सामायिक ,तत्व चर्चा त्यागी भवनात प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. पूज्य आर्यिका विज्ञानमती माताजी यांचे साध्या सोप्या सरळ भाषेत हृदयाला द्रवित करणारे प्रवचन होत असतात ,त्यामुळे भाविकांची विशेष आवर्जून उपस्थिती असते. त्यांनी आतापर्यंत ३० ते ३५ग्रंथांची रचना केली आहे .याकामी पार्श्वनाथ सेवा समितीचे पद्मावती युवा मंचचे पदाधिकारी विशेष दक्षता घेत आहेत.