बोदवड (प्रतिनिधी) कला शाखेत सर्वाधिक कलावंत जन्माला येत असतात आणि घडतात तसेच या माध्यमातून ते समाजाचे प्रबोधन करत असतात, असे प्रतिपादन प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले. ते येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला शाखेव्दारा आयोजित उमंग उद्घाटन कार्यक्रम वेळी बोलत होते.
प्राचार्य अरविंद चौधरी यांनी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना कलेविषयी सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की,कला शाखेत सर्वाधिक कलावंत जन्माला येत असतात आणि घडतात तसेच या माध्यमातून ते समाजाचे प्रबोधन करत असतात. यावेळी व्यापीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी,उपप्राचार्य डॉ.विनोद चौधरी, उमंग समिती प्रमुख डॉ.रत्ना जवरास समिती सदस्य डॉ.अजय पाटील,डॉ.मनोज निकाळजे,प्रा.वैशाली संसारे उपस्थित होते. तसेच सूत्रसंचालन कु.निकिता गोरे,तर कार्यक्रमा मागची भूमिका क्रिष्णल किनगे या विद्यार्थीनीने मांडली. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. सूत्रसंचलन पूजा व्यवहारे,तर आभार प्रदर्शन करिष्मा तडवी हिने केले. रोहिणी धनगरव अश्विनी पाटील या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. उमंग कार्यक्रमाचे आयोजन समिती प्रमुख डॉ. रत्ना जवरास, डॉ.अजय पाटील, डॉ.मनोज निकाळजे, भूषण धनजे तसेच द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी सर्व कला शाखेच्या प्राध्यापकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.