TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2025
in भुसावळ, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) : बदलत्या काळाची पाऊले ओळखून डिजिटल मिडीयाशी सुसंगत होत भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या न्युज पोर्टलने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षणाची संधी व उपलब्ध वाटा या विषयावर ‘वाटा शिक्षणाच्या’ या आशयावर काढलेली शैक्षणिक पुरवणी विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेशभाऊ फालक यांनी येथे व्यक्त केला. शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाच्या संगणक हॉलमध्ये गुरुवारी ‘वाटा शिक्षणाच्या’ या पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यांची प्रमुख उपस्थिती
भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकीताई पाटील, जळगावातील लाईव्ह ट्रेंड न्यूजचे संपादक शेखर पाटील (संपादक लाईव्ह ट्रेंड न्यूज), भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई संजय सावकारे, महिला समुपदेशक आरतीताई चौधरी आदींची उपस्थिती होती.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

जाहिरातदारांसह मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
द वर्ल्ड स्कूलचे संचालक व सी.ए.रोहित कोलते, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी.फालक, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल, वेलनेस फाउंडेशनचे निलेश गोरे, अ‍ॅड.निर्मल दायमा, चेतन जैन, मयूर अंजाळेकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पर्यावरण तज्ज्ञ नाना पाटील यांनी केले तर आभार ब्रेकींगचे कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी मानले.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : कृष्णात पिंगळे
‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून काढण्यात आलेली ‘वाटा शिक्षणाच्या’ ही पुरवणी विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितपणे दिशादर्शक ठरेल, यात शंकाच नाही, असा आशावाद भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंग्ळे यांनी येथे व्यक्त केला. शिक्षणाशिवाय तरणापोय नाही, असे सांगत त्यांनी पत्रकारीतेचा ईतिहास यावेळी उलगडून दाखवला. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी गणेश वाघ यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देत त्यांचा पत्रकारीतेचा प्रवास अत्यंत उज्वल असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.

भुसावळात डिजिटल मिडीया सर्वाधिक विकसीत : शेखर पाटील
शहरातील नाहाटा महाविद्यालयात आपले पाच वर्ष शिक्षण झाले व ज्या वर्गात शिक्षण घेतले त्याच वर्गात प्रमुख अतिथी म्हणून बोलण्याची संधी मिळाल्याचा आनंद अलौकीक आहे. बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारत मी प्रिंटमधून डिजिटल मिडीयात पदार्पण केले आहे. जळगाव जिल्ह्यात डिजिटल मिडीया विकसीत झाला असलातरी तो भुसावळातून सर्वाधिक विकसीत झाला असल्याचे मत लाईव्ह ट्रेंडचे संपादक शेखर पाटील यांनी व्यक्त केले. अनेक पत्रकार मला फालो करतात व मला फालो करणार्‍यांमध्ये भुसावळचे पत्रकार गणेश वाघ यांचादेखील समावेश आहे. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देणे आता काळाची गरज आहे. आता स्टोरी टेलिंगचा फार्म्युला आला असून बदलत्या काळानुसार पत्रकारांनीदेखील अपडेट होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मी जळगावकर असलोतरी प्राऊड भुसावळकर असल्याचे शेखर पाटील म्हणाले.

मान्यवरांचा वृक्षाचे रोप देवून सन्मान
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा बुके ऐवजी आवळा व जास्वंदीचे रोपटे देवून आयोजकांकडून यावेळी सन्मान करण्यात आला व पर्यावरण संवर्धनाचा या माध्यमातून संदेश देण्यात आला.

विद्यार्थ्यांना पुरवणी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल : डॉ.केतकी पाटील
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ.केतकी पाटील म्हणाल्या की, ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ची ‘वाटा शिक्षणाची’ ही पुरवणी विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. आगामी काळात आणखी तज्ज्ञ व मार्गदर्शकांना सोबत घेवून शैक्षणिक क्षेत्राविषयी उहापोह करून वाटचाल करावी व त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्यास तयार असल्याचे त्या म्हणाल्या.

पालकांनाही मार्गदर्शन गरजेचे : रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, नाहाटा महाविद्यालयात होत असलेल्या कार्यक्रमाचा वेगळा आनंद आहे. मंत्री संजय सावकारे यांनीदेखील याच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. मुलांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे त्या सोबतच पालकांना मार्गदर्शन गरजेचे आहे. ‘वाटा शिक्षणाच्या’ ही पुरवणी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

एआयसाठी तयार रहा : आरती चौधरी
महिला समुपदेशक आरती चौधरी म्हणाल्या की, एआय संकल्पना सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन पदवी या माध्यमातून मिळवता येवू शकते. वाटा शिक्षणाच्या या पुरवणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निश्चितपणे दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात ; पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार !

January 4, 2023

पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं; ममता बॅनर्जींचा भाजपाला इशारा, म्हणाल्या…

December 24, 2020

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 26 डिसेंबर 2025 !

December 26, 2025

महाराणा प्रतापांचा पूर्णाकृती पुतळ्यासाठी खा. उन्मेश पाटील यांनी प्रयत्न करावेत ; राजपूत समाज संघटनांची मागणी !

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group