TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

पाटील मळ्यात रक्तरंजित थरार; काही वेळात अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

vijay waghmare by vijay waghmare
September 12, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – पोळा सणाचा उत्साह ओसरत असतानाच भुसावळला हादरवून सोडणारी रक्तरंजित घटना गुरुवारी रात्री घडली. शहरातील पाटीलमळा भागात भुसावळ रेल्वेत कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निघृण हत्या करण्यात आली. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले, तरी घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

शहरातील समता नगरमधील तुषार गोविंद सोनवणे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार सोनवणे हे गुरुवारी रात्री परिचिताची दुचाकी (एमएच- १९, सीएच- १४०५) घेऊन पाटीलमळा परिसरातून जात होते. याचवेळी त्यांचा एका अल्पवयीन संशयिताशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान काही क्षणांतच जीवघेण्या हल्ल्यात झाले. संशयिताने तुषार यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमांमुळे मोठा रक्तस्त्राव होऊन तुषार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेआठ वाजेनंतर या घटनेची माहिती पोलिसांच्या ११२ क्रमांकावर देण्यात आली. माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

आली. दरम्यान, जळगाव गुन्हे शाखेचे पथक शहरातच असल्याने त्यांनीही तपासात सहभाग घेतला. हल्ल्यानंतर संशयित पायी पसार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या संभाव्य मार्गाचा माग काढला. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पोळा सण उत्साह व शांततेत पार पडल्यानंतर रात्री घडलेल्या या निघृण हत्येने भुसावळच्या शांततेला हादरा बसला आहे. पाटीलमळा परिसरातील या रक्तरंजित घटनेमुळे नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. हत्येच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण केले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले.हत्येमागचे गूढ कायम नेमक्या कोणत्या कारणातून तुषार सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, याचे गूढ अद्याप कायम आहे. वादाचे कारण काय होते हल्ल्यामागे अन्य काही कारण आहे का, तसेच य घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सव् बाबींच्या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच रचला हत्येचा कट

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने काही दिवसांपूर्वीच तुषारच्या हत्येचा कट रचला होता. आईसोबत तुषारचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा संशय अल्पवयीन आरोपीच्या मनात होता. या संशयातून निर्माण झालेल्या रागातूनच त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. राहुल तायडे तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBrutal murder of railway employee in Bhusawal

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा परिषदची गट-गण रचना आज होणार अंतिम

August 18, 2025

गुजरातमध्ये पूल कोसळला, 500 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती !

October 30, 2022

भडगावात अनोखी चोरी ; चोरट्याने शासकीय कार्यालयातून थांबविल्या कागदी फाईल

February 11, 2022

आज माझे दोघी हात पवित्र व सोन्या सारखे झाले : महापौर जयश्री महाजन

August 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group