
जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या मानव संसाधन विभागाने गेल्या सव्वा वर्षात राबवलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, धोरणात्मक निर्णय आणि कर्मचारी कल्याणाच्या योजनांचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ या पुस्तकाचे प्रकाशन ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. ११) झाले.
महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला संचालक श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. धनंजय औंढेकर (संचालन), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. सचिन तालेवार (प्रकल्प), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन), कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत (मानव संसाधन), मुख्य महाव्यवस्थापक श्री. भूषण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) मा. आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र, स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी या पुस्तकाच्या शुभेच्छा संदेशामध्ये मानव संसाधन विभाग आणि अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या विविध उल्लेखनीय कामांचा गौरव केला आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी मानव संसाधन विभागाला गेल्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी निर्णय आणि उपक्रमांच्या माध्यमातून लोकाभिमुख व कर्मचारीभिमुख चेहरा मिळवून दिला आहे.
शून्य विद्युत अपघातासाठी विविध उपाययोजना, विश्वविक्रमी विद्युत सुरक्षा जनजागृती अभियान, महिला कर्मचारी सक्षमीकरण व सन्मान, अभियंते व जनमित्रांचा सन्मान, कर्मचारी संघटनांशी मासिक संवाद, कौटुंबिक स्नेहमेळावे, हरित ऊर्जेसाठी अर्थसाहाय्य, क्रीडा व नाट्यस्पर्धा, प्रशिक्षण व भरती प्रक्रिया, कर्मचारी कुटुंबांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या आर्थिक तरतूदीत वाढ आणि या सर्वांची अंमलबजावणी यावर हे पुस्तक आधारित आहे. उपमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. निशिकांत राऊत यांनी या पुस्तकाचे लेखन व संपादन केले आहे.
या कार्यक्रमाला विशेष कार्य अधिकारी व मुख्य अभियंता श्री. मंगेश कोहाट, मुख्य अभियंते सर्वश्री सुनील काकडे, दिपक कुमठेकर, राजेश नाईक, दत्तात्रेय बनसोडे, सुंदर लटपटे, चंद्रमणी मिश्रा, अरविंद बुलबुले, ज्ञानेश कुलकर्णी, अंकुर कावळे, पवनकुमार कच्छोट, पंकज तगलपल्लेवार, राजाराम माने, अनिल डोये यांच्यासह अधिकारी व अभियंते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक (मानव संसाधन) यांचे तांत्रिक सहायक डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले.
















