TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महामार्गावर मृत्यूचा थरार

ट्रकची मोपेडला भीषण धडक; दोन ठार; मोपेडला दुर पर्यंत नेले फरफटत

vijay waghmare by vijay waghmare
September 24, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवारी दुपारी काळजाचा थरकाप उडविणारा भीषण अपघात झाला. दीपनगर उड्डाणपुलाजवळ वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येणाऱ्या टिव्हीएस मोपेडला मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोपेड ट्रकच्या पुढील भागात अडकली आणि ट्रकने ती दीपनगर उड्डाणपुलापासून दोन किलो मिटर शेरे पंजाब हॉटेलजवळपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत देवेन चौधरी आणि सलीम मिर्जा बेग या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही वरणगाव येथून भुसावळच्या दिशेने टिव्हीएस मोपेडवरून येत होते. याचवेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोपेड ट्रकच्या पुढील भागात अडकल्याने काही अंतरापर्यंत रस्त्यावरून फरफटत गेली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ एकच खळबळ उडाली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

या भीषण अपघातात देवेन चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सलीम मिर्जा बेग यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघे रेलवे ठेकेदारीत काम करीत असल्याचे समजते, दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

आरटीओ कर्मचाऱ्यांची तत्परता

अपघाताच्या वेळी योगायोगाने याच मार्गावरून आरटीओ विभागातील पोलीस कर्मचारी जात होते. त्यांच्या निदर्शनास अपघाताची घटना येताच त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले तसेच संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. गंभीर अवस्थेतील जखमीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

ट्रकचालक पसार; टोलनाक्यावर पकडल्याची माहिती

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता ट्रक घेऊन पुढे निघून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, पोलिसांनी तत्परतेने शोध घेत संबंधित ट्रक व चालकाला नशिराबाद टोलनाक्याजवळ पकडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत तपशील पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

नेहमीप्रमाणे घराबाहेर पडलेले दोन तरुण पुन्हा घरी परतलेच नाहीत. या एका अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवेन चौधरी, सलीम मिर्जा बेग दोघे रेल्वे ठेकेदारीच्या कामाला होते. दोघेही भुसावळ येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेने दोन कुटुंबांचा आधार हिरावला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A chilling brush with death on the highwaybhusawal

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नक्षलवाद्यांशी लढताना पाच जवान शहीद, २१ जण बेपत्ता

April 4, 2021

‘या’ ‘एटीएम’मधून निघाली चक्क पाच पट अधिक रक्कम

September 22, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२३ !

October 24, 2023

उधारीवर सामान न दिल्याने टोकाचा वाद ; दुकानदार मुलाला मारहाण, महिलेचे गुप्तांगही कापले !

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group