TheClearNews.Com
Friday, June 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपल्या जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

११ वर्षांखालील ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत लाखोंची बक्षिसे

vijay waghmare by vijay waghmare
July 29, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथे ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील आकाश ग्राऊंडमध्ये केले जाणार आहे. बाल चमूंचा हा बुद्धिबळ महासंग्राम जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असून जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला असून देशभरातून ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी या अजिंक्यपद स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, यातील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य जैन हिल्स परिसरातील अनुभूती या भव्य दिव्य मंडपात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत एकूण ११ फेऱ्या होणार असून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आखलेल्या नियमावलीनुसार ही स्पर्धा पार पडेल या स्पर्धेत कोलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच श्री देवाशीष बरुआ हे मुख्यपंचांची भूमिका निभवतील तर जळगावचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे हे सहाय्यक पंच असून गुजरातचे प्रशांत रावल यांच्यासह अन्य १४ पंच हे या स्पर्धेचे संचलन करतील. ही बुद्धीबळ स्पर्धा मुली व मुले अशा स्वतंत्र वयोगटात आयोजित केली आहे या स्पर्धेत प्रत्येक डावा साठी बुद्धिबळ घड्याळांचा वापर अनिवार्य असून प्रत्येकी ९० मिनिटे व प्रत्येक चाली साठी ३० सेकंदाची वाढीव वेळ निर्धारित करण्यात आली आहे. बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकूण ८ लाखांची रोख पारितोषिके तसेच चषक दिले जाणार आहे. सदरील स्पर्धा जरी ११ वर्षा आतील वयोगटातील मानांकन स्पर्धा असली तरी स्पर्धेतील विजेते खेळाडू आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतात अशा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग पाहता नवोदित खेळाडूंना देखील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळते. क्लासिकल प्रकारातील आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणे हे बहुतांशी बुद्धिबळ खेळाडूंचे स्वप्न असते, कमी वयातच जर हे मानांकन प्राप्त झाले तर खेळाडूंना भविष्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवणे तसेच बुद्धिबळातील स्पर्धात्मक वाटचाल सुकर होणे याबरोबरच बुद्धिबळ क्षेत्रात संधीची नवनवीन दालने पादाक्रांत करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने प्राप्त होणार आहे. या स्पर्धेत अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, अशा विविध राज्यातील खेळाडूंशी आपला खेळ आजमावण्याची संधी यातून मिळेल तसेच या राष्ट्रीय स्पर्धेद्वारा आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधीसुद्धा या स्पर्धकांना मिळणार आहे.
या स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ७, ९ व ११ वर्षातील वयोगटातील तसेच स्थानिक गुणवान खेळाडूंना मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची उल्लेखनीय बाब म्हणजे ५५० नोंदणीकृत खेळाडूंमध्ये जवळपास ४०० खेळाडूंना फिडे मानांकन प्राप्त आहे त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल(२२५१), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले खेळाडू असून या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळले जातील तसेच चेसबेस द्वारे स्पर्धेचे सामने आपणास त्यांच्या ॲपद्वारे लाईव्ह पाहण्यास मिळणार आहेत.

READ ALSO

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक डावातील निकालानुसार विजयी उपविजय व बरोबरीत असलेल्या खेळाडूंना विशेष मूल्यांकनानुसार रोख रकमेचे पारितोषिक जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड तर्फे दिले जाणार आहे प्रत्येक स्पर्धकांच्या उत्कृष्ट खेळासाठी प्रोत्साहेतू पुरस्कृत करणारी भारतातील ही एकमेव बुद्धिबळ स्पर्धा असेल असे मत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष अतुल जैन यांनी याप्रसंगी मांडले.

सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे चेअरमन श्री अशोक जैन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, उपाध्यक्षा अंजली कुलकर्णी, जळगाव जिल्हा बुद्धिवान संघटनेचे सचिव नंदलाल गादीया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव शकील देशपांडे व संजय पाटील सदस्य सर्वश्री चंद्रशेखर देशमुख, तेजस तायडे, पद्माकर करणकर, नरेंद्र पाटील, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, रवींद्र दशपुत्रे, डॉ. तुषार उपाध्ये व सल्लागार सदस्य आर. के. पाटील, विवेक दाणी, यशवंत देसले तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

June 11, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव मनपा व मराठी प्रतिष्ठान साकारणार ‘हिरवाई’ प्रकल्प ; चित्रपट अभिनेते सयाजी शिंदेंही राहणार उपस्थित

September 22, 2021

तुमच्या मुलास गुन्ह्यात पकडलेय, सोडवायचे असले तर पैसे द्या !

December 26, 2024

अंगाची होणार लाही-लाही, जळगाव जिल्ह्यात तीन दिवस उष्णता लाट !

March 28, 2022

जळगाव जि.प गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना जाहीर ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

June 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group