TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव मनपा क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) युकेमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात आजपासून ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिली.

राज्य शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात आजपासून ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी राऊत बोलत होते. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असताना युकेमध्ये आता कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच सध्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने निमोनियासारखे आजार बळावतात. याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याने मनपा क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवेसारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात येत आहे. मात्र यासाठी पुरेसे पुरावे सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच रात्री बाहेरगावावरुन येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र नागरीकांनी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम रात्री ११ पूर्वीच उरकणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गास कोणतीही अडचण येवू नये याकरीता या कालावधीत त्यांच्या कामाच्या वेळा या रात्री ११ पूर्वी व सकाळी ६ नंतर ठेवण्याबाबत आस्थापनांना सुचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

READ ALSO

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. याकरीता ३३ ऑक्सिजन सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही परिस्थितीस प्रशासन सज्ज असले तरी नागरीकांनीही सतत मास्कचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाताना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात राहणार संचारबंदी

३१ डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता ३१ डिसेंबरच्या रात्री ११ ते १ जानेवारीच्या सकाळी ६ या वेळेत जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातही संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई – डॉ. मुंढे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. जे नागरीक या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांचेवर दंडात्मक कारवाई बरोबरच आवश्यकता भासल्यास गुन्हेही दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना पोलीस स्टेशनच्या प्रभारी यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पॉईट तसेच पेट्रोलिंग करणाऱ्यांमार्फतही तपासणी करण्यात येणार आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीस व महापालिकेचे संयुक्त पथक कारवाई करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
Next Post

२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन; मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“४३ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लहान माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक”

December 29, 2025

अट्टल मोटरसायकल चोरट्यांना सिनेस्टाईल अटक ; शहर पोलिसांची कामगिरी

December 15, 2020

तामिळनाडूच्या उच्च शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले, हिंदी भाषिक पाणीपुरी विकतात

May 13, 2022

शेतात मशागतीचे काम सुरु असतांना चालकाच्या अंगावरून गेले रोटाव्हेटर !

October 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group