TheClearNews.Com
Saturday, November 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांची माहिती

vijay waghmare by vijay waghmare
November 4, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

जळगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या बळावर राज्यात आता ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. आगामी मार्च अखेर १०० टक्के कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. ३) केले.
नवी दिल्ली येथे भारत रिन्यूबल एनर्जी समिट अँड एक्सपो २०२६ या केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चासत्रात श्री. लोकेश चंद्र बोलत होते. ‘डिस्ट्रीब्यूटेड एनर्जी फॉर एनर्जी सिक्युरिटी, सेल्फ रिलायन्स अँड विकसित भारत २०४७’ या चर्चासत्रात त्यांनी महाराष्ट्राने विकेंद्रीत स्वरूपात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभे करून कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कशी कामगिरी केली आहे, हे स्पष्ट केले. या चर्चासत्रात पंतप्रधानांचे सल्लागार श्री. तरुण कपूर यांचे मुख्य भाषण झाले.
इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीच्या नवव्या सत्रात आयोजित ‘पंप्स टू प्रोग्रॅम्स: स्केलिंग सोलरायझेशन ऑफ अॅग्रीकल्चर इन द ग्लोबल साउथ’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात श्री. लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यांची यशोगाथा आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर मांडली. सोलर अलायन्सचे महासंचालक श्री. आशिष खन्ना यांनी यावेळी श्री. लोकेश चंद्र यांच्याशी संवाद साधला.
श्री. लोकेश चंद्र यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही पीएम कुसुम या केंद्राच्या योजनेच्या आधारे सुरू करण्यात आली असून या योजनेत १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकेंद्रीत स्वरूपात उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे ७ हजार मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातून उपलब्ध होणारी वीज आणि अन्य तांत्रिक उपायांच्या आधारे आता ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरु आहे. शंभर टक्के कृषी पंपांना दिवसा सौरऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते मार्चअखेर पूर्ण होईल.
त्यांनी सांगितले की, कृषिपंपांना दिवसा व रात्री असा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा करण्यातून निर्माण होणारी समस्या सर्व देशातील सर्व वीज वितरण कंपन्यासमोर आहे. कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेकडे वळणे हाच आता पुढचा मार्ग आहे. त्यामुळे वीज वितरण कंपन्यासमोर समस्या दूर होतील. कृषी पंपांना दिवसा दर्जेदार वीज पुरवठा उपलब्ध होईल. त्याचबरोबर राज्य सरकारचा अनुदानाचा खर्च कमी होईल.
नवीन गुंतवणूक व वाढती जीवनशैली यामुळे महाराष्ट्रात विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. आगामी काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याने आराखडा तयार केला आहे. नवीकरणीय उर्जेवर भर देऊन विजेची गरज पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती श्री. लोकेश चंद्र यांनी दिली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी केलेले नियोजन आणि तांत्रिक उपाय योजना याची श्री. लोकेश चंद्र यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी सांगितले की, सौर कृषी पंप लावण्यात राज्याने आघाडी घेतली असून देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी ६५ टक्के सौर कृषिपंप राज्यात बसवण्यात आले आहेत. सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे साधन मिळत आहे. त्यांना हवे तेव्हा सिंचन करता येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. सोबत शेतीची उत्पादकताही वाढत असल्याचा अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon100% daytime power supply for agricultural pumps in the state by the end of March

Related Posts

गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 05 नोव्हेंबर 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करतंय : संजय राऊत

August 5, 2021

राज्यात महाजनकोचा ५९४० कोटींचा कोळसा टेंडर घोटाळा ; राष्ट्रवादीची सीबीआयकडे तक्रार

December 17, 2021

राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो शेअर करत शिवसेनेचा मनसेवर हल्लाबोल

April 4, 2022

धरणगावात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देणार : जितेंद्र महाजन यांचा ईशारा !

January 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group