TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

जळगाव (प्रतिनिधी) – वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, जळगाव तालुक्यातील घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक आस्थापनांमधील अनधिकृत वीजवापरावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. महामार्गालगत असलेली हॉटेल, ढाबे आणि बिअर बार यांच्याकडून होणाऱ्या अनधिकृत वीजवापरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे यांच्या नेतृत्वाखाली शिरसोली शाखेचे कनिष्ठ अभियंता रोहन पाटील व जळगाव उपविभागाच्या सहायक अभियंता माधुरी पाटील यांनी महामार्गालगतच्या हॉटेल, ढाबे व बिअर बारमधील अनधिकृत वीजवापराविरोधात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान अनधिकृत वीजवापर करणाऱ्या तीन जणांविरुद्ध वीजचोरीप्रकरणी कारवाई करण्यात आली. संबंधित ग्राहकांना एक लाख रुपयांहून अधिक रकमेची दंडात्मक बिले देण्यात आली. या कारवाईतून व्यावसायिक आस्थापनांनीही अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीज वापरणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.
लमांजन येथे एबी केबल टाकून २३ अनधिकृत वीजजोडण्यांना प्रतिबंध
लमांजन गावात वीजचोरीला प्रतिबंध करण्यासाठी कनिष्ठ अभियंता अर्जुन आव्हाड यांनी महत्त्वपूर्ण उपाययोजना केली. गावातील अनधिकृत वीजजोडण्या अर्थात आकडे टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी एअर बंच केबल (एबी केबल) टाकण्यात आली. या उपाययोजनेमुळे २३ अनधिकृत वीजजोडण्या घेण्यास प्रतिबंध करण्यात यश आले. यासोबतच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून अनधिकृत वीजवापराऐवजी अधिकृत व नियमित वीजजोडणी घेण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ९० टक्के नागरिकांनी नियमित वीजजोडणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे वीजचोरी रोखण्यासोबतच नागरिकांना अधिकृत वीजपुरवठ्याच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
आव्हाणे येथे सहा वीजआकडे हटविले; ३२.५ अश्वशक्तीचा अनधिकृत भार कमी
कानळदा शाखेचे कनिष्ठ अभियंता इम्तियाज अली यांनी आव्हाणे गावात कारवाई करून अनधिकृतरीत्या सुरू असलेले शेतीपंपांचे सहा वीजआकडे काढून टाकले. या कारवाईमुळे एकूण ३२.५ अश्वशक्तीचा अनधिकृत वीजभार कमी करण्यात आला. परिणामी, वितरण व्यवस्थेवरील सुमारे १८ अँपिअरचा भार कमी होण्यास मदत झाली आहे. यामुळे परिसरातील वीज वितरण व्यवस्थेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास हातभार लागला आहे.
महावितरणच्या या विशेष मोहिमेमुळे घरगुती ग्राहकांपासून व्यावसायिक आस्थापनांपर्यंत सर्वच स्तरांवरील अनधिकृत वीजवापराला आळा बसण्यास मदत होत आहे. वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर अप्रत्यक्ष आर्थिक भार पडण्याबरोबरच वीज वितरण व्यवस्थेवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत वीजजोडण्या घेणे टाळावे, अधिकृत वीजजोडणीद्वारेच वीज वापरावी आणि वीजचोरीविरोधातील मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonhotels and roadside eateries (dhabas)—along with domestic consumers—are now on the radar!In the drive against electricity theft

Related Posts

जळगाव

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

November 5, 2026
जळगाव

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

November 5, 2026
जळगाव

दिवाळीच्या रोषणाईत विद्युत सुरक्षेकडे लक्ष द्या

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
जळगाव

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

November 5, 2026
जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026
Next Post

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धानोरा येथे चोरट्यांचा धुमाकूळ ; एका घरासह सात दुकाने फोडली !

September 17, 2023

रविवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी !

November 27, 2024

जबरी चोरीसह विनयभंगच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

February 27, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २८ जुलै २०२२ !

July 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group