TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

शिखर परिषदेत उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी : मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सात आयामी दृष्टीकोनातून महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) यांच्या मूल्यांकन अहवालानुसार ‘रिन्युएबल एनर्जी स्टेट असेसमेंट फ्रेमवर्क’ (RE-SAF) अंतर्गत भारतामध्ये हरित ऊर्जेच्या निर्मिती आणि विकासात महाराष्ट्र राज्याला देशातील राज्यांमध्ये द्वितीय स्थान मिळाले आहे.

नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद व प्रदर्शन २०२६’ (Bharat RE Summit & Expo 2026) च्या समारोप सोहळ्यात गुरुवारी (दि. ५) उपराष्ट्रपती  सी. पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांना पुरस्कार प्रदान करून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री मा. श्री. प्रल्हाद जोशी व राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

सात-आयामी सुधारणांमुळे बदल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ, ऊर्जा-सुरक्षित आणि स्वावलंबी भारताच्या संकल्पनेला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्राच्या बदलासाठी सात-आयामी दृष्टिकोन स्वीकारला आहे. या दृष्टिकोनामध्ये अक्षय ऊर्जा निर्मितीचा विस्तार, विकेंद्रित प्रकल्पांद्वारे कृषी क्षेत्राचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, स्मार्ट मीटरिंगद्वारे डिजिटल रूपांतरण, धोरणात्मक सुधारणा, ऊर्जा साठवणुकीस प्रोत्साहन आणि परवडणाऱ्या वीज सेवांची उपलब्धता सुधारणे या सात परस्परसंबंधित घटकांचा समावेश आहे. या उपायांमुळे राज्यातील वीज निर्मिती, वितरण आणि वापराच्या पद्धतीमध्ये सकारात्मक बदल घडत आहे. महाराष्ट्राने हरित ऊर्जा विकासाला गती देण्यासाठी आणि वीज क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित देखील आता दिसू लागले आहेत.

महाराष्ट्राच्या कृषी सौरऊर्जा मॉडेलने वेधले देशाचे लक्ष – महाराष्ट्राच्या ऊर्जा रणनीतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या व सौरक्रांतीचे माध्यम बनलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० द्वारे कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी उपकेंद्रांजवळ विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या दिवसा व शाश्वत वीजपुरवठ्याचे स्वप्न साकार झाले आहे. या योजनेतून १६ हजार मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून त्यातील सुमारे ७ हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे सध्या ४ हजार ५०० हून अधिक कृषी वीजवाहिन्या आणि १,२०० उपकेंद्रांच्या सौरऊर्जीकरणामुळे १८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरु झाला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘एमएसईबी सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली असून, महाराष्ट्राचे हे फिडर-स्तरीय मॉडेल इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.

कृषी आणि घरगुती क्षेत्रात सौर उपक्रमांचा विस्तार – यासोबतच, पीएम-कुसूम (घटक ब) आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातीन सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे १२ लाख ऑफ-ग्रिड सौर कृषी पंप बसवण्यात आले असून, हे प्रमाण देशातील एकूण स्थापनेच्या ६५ टक्के आहे. अवघ्या ३० दिवसांत ४५,९११ कार्यरत सौर पंप बसवून महावितरणने ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद केली आहे. तसेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावरील सौरऊर्जा वापरामध्ये राज्याने देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या योजनेत महावितरणची एकूण छतावरील सौर प्रकल्पांची क्षमता ७ हजार १०० मेगावॅटपेक्षा अधिक झाली आहे. याशिवाय १७ गावांना पूर्णपणे सौरऊर्जेवर आणणारी ‘सौर ग्राम योजना’ आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी ‘स्मार्ट’ योजना यासारख्या उपक्रमांतून हरित व स्वच्छ ऊर्जेचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे दिला जात आहे.

ऊर्जा विभागाचे नेतृत्व आणि संस्थात्मक समन्वय
राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली ऊर्जा विभागाने ही उत्तुंग कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह महाऊर्जा, महानिर्मिती आणि महापारेषण यासारख्या संस्थांच्या समन्वयामुळे राज्य सरकारची ध्येयधोरणे प्रत्यक्ष अंमलबजावणीत यशस्वी ठरत आहेत. हा पुरस्कार म्हणजे राज्यातील राजकीय नेतृत्व, प्रशासकीय यंत्रणा, अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. सोबतच भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्रांतीमधील महाराष्ट्राचे योगदान देखील अधिक अधोरेखित झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ऊर्जा मंत्रालयमहाराष्ट्रहरित ऊर्जा

Related Posts

जळगाव

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

November 5, 2026
गुन्हे

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

November 5, 2026
जळगाव

दिवाळीच्या रोषणाईत विद्युत सुरक्षेकडे लक्ष द्या

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
जळगाव

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

November 5, 2026
जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026
Next Post

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हॉटस्ऍपवर महापुरूषांची विटंबना ; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा

April 22, 2021

ट्रॅक्टर रॅलीत ४ शेतकरी नेत्यांवर गोळ्या घालून ठार मारण्याचा कट; शूटरला पकडले

January 23, 2021

नशिराबादच्या अजिंक्य महिला मंडळात घडला इतिहास

October 15, 2021

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रवेशिका पाठविण्याकरिता १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

January 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group