TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला शासन निर्णयाची मोहोर

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील उद्योगांना विदर्भ आणि मराठवाड्याच्या धर्तीवर विशेष औद्योगिक प्रोत्साहने देण्याच्या मागणीला अखेर शासन निर्णयाची अधिकृत मोहोर उमटली आहे. पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, ४ नोव्हेंबर रोजी उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योग-व्यापार क्षेत्राला दिवाळीची मोठी भेट मिळाली आहे.

विशेष म्हणजे, या निर्णयामागे जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींची एकजूट महत्त्वाची ठरली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी या मागणीला पाठबळ दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जळगावच्या औद्योगिक विकासाला राज्याच्या औद्योगिक नकाशावर अधिक महत्त्व मिळण्याची अपेक्षा आहे.

READ ALSO

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

उद्योगमंत्री सामंतांच्या बैठकीतून निर्णयाला गती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून २५ ऑगस्ट २०२६ रोजी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विशेष बैठक झाली होती. या बैठकीत जळगाव जिल्ह्याला विदर्भ मराठवाड्याप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहने देण्याची मागणी ठामपणे मांडण्यात आली. उद्योगमंत्र्यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याचे फलित शासन निर्णयाच्या माध्यमातून समोर आले.

एमआयडीसी पुरते मर्यादित नाही; सर्व तालुक्यांना लाभ

महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या तसेच विद्यमान उद्योगांचे विस्तारीकरण व विविधीकरण करणाऱ्या पात्र घटकांना विशेष प्रोत्साहने मिळणार आहेत. याचा लाभ केवळ एमआयडीसीपुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पात्र औद्योगिक प्रकल्पांना मिळू शकणार आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम तसेच पात्र मोठ्या उद्योगांसाठीही धोरणातील निकषांनुसार विविध सवलती उपलब्ध होणार आहेत. स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या ८० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहनांची कमाल मर्यादा आणि दहा वर्षांचा प्रोत्साहन कालावधी यामुळे उद्योजकांना मोठे आर्थिक बळ मिळण्याची शक्यता आहे. औद्योगिक अनुदान, व्याज अनुदान, मुद्रांक शुल्क सवलत आणि वीजविषयक प्रोत्साहनांमुळे नवीन गुंतवणुकीला चालना मिळेल.

रोजगारनिर्मितीला मिळणार नवी गती जळगाव जिल्हा केळी, कापूस आणि कृषी उत्पादनांसाठी ओळखला जातो. या क्षेत्रांशी संबंधित कृषीप्रक्रिया उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि पूरक व्यवसायांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच व्यापार, वाहतूक आणि सेवा क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्न ांना मिळालेले हे यश आगामी काळातील राजकीय आणि आर्थिक समीकरणांतही महत्त्वाचे ठरणार आहे.

नवीन शासन निर्णयामुळे उद्योग वाढीला येणार गतीः आ. राजु मामा भोळे

जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीला डी प्लस दर्जा प्राप्त झाला असून उद्योगांना सवलती मिळणार आहेत. यासंदर्भात शासनाने बुधवारी काढलेल्या शासन निर्णयामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. परिणामी जळगाव एमआयडीसीचा विस्तार होणार असून तरूणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. विदर्भ व मराठवाड्यामुळे उद्योगांना प्रोत्साहने मिळावे, यासाठी आपण वारंवार शासनाकडे पाठपुरावा करत होतो अखेर या पाठपुराव्यांना यश मिळाले आहे, असे आ. राजु मामा भोळे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA major Diwali gift for the industrial sector in Jalgaon

Related Posts

जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026
गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
गुन्हे

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

November 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026
गुन्हे

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

November 3, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आव्हानात्मक परिस्थिती असूनही महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 8, 2021

मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे !

September 1, 2024

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार १५ एप्रिल २०२२ !

April 15, 2022

दोन लाखासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

June 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group