TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिवाळीच्या रोषणाईत विद्युत सुरक्षेकडे लक्ष द्या

खबरदारीचे महावितरणकडून आवाहन

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : आनंदाचा व उत्साहाचे पर्व असलेल्या दिवाळीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त घरोघरी विद्युत रोषणाई, आकर्षक विद्युत माळा आणि आकाशकंदिलांची सजावट करण्याची लगबग सुरू झाली आहे. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक घर, इमारती, गॅलरी आणि परिसरात विद्युत दिव्यांच्या माळा लावून रोषणाई करतात. ही सजावट करताना वापरण्यात येणाऱ्या विद्युत माळांचा दर्जा तपासणे आवश्यक आहे.

READ ALSO

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

गॅलरीतील लोखंडी जाळी, घरातील लोखंडी जिना किंवा इतर धातूंच्या वस्तूंपासून विद्युत माळा आणि आकाशकंदिलांच्या वायर सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात. सजावटीसाठी वापरण्यात येणारी वायर अखंडित आणि सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच विद्युत माळा लावताना ओलसर हातांनी प्लग किंवा स्विचला स्पर्श करू नये. सजावटीच्या उत्साहात विद्युत सुरक्षेचे नियम विसरू नयेत. योग्य दर्जाच्या विद्युत साहित्याचा वापर, सुरक्षित जोडणी आणि आवश्यक खबरदारी घेतल्यास संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
काय काळजी घ्यावी?
घरातील किंवा इमारतीतील अर्थिंग योग्य असल्याची खात्री करावी.
आकाशकंदील लावताना विद्युत तारांची विशेष काळजी घ्यावी.
तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वायरचा वापर करू नये.

वायरमध्ये बिघाड असल्यास दुरुस्ती करून घ्यावी.
तुटलेल्या किंवा चिकटपट्टी जोडलेल्या वायरचा वापर टाळावा.
विद्युत माळा आणि घरगुती उपकरणांच्या जवळ तेलाचे दिवे किंवा मेणबत्त्या लावू नयेत.
अनेकदा आकाशकंदील किंवा विद्युत माळा लावण्यासाठी थ्री-पिन प्लगचा वापर न करता वायर थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या सहाय्याने खोचली जाते. अशा पद्धतीमुळे प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते.
विद्युत जोडणीसाठी योग्य प्लग आणि सॉकेटचाच वापर करावा.
एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे जोडून अतिरिक्त भार टाकू नये.
विद्युत यंत्रणेजवळ फटाके फोडू नयेत
विद्युत वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक विद्युत यंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीज वाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत.
कुठे संपर्क कराल?
विद्युत यंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास ‘महावितरण’च्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPay attention to electrical safety amidst Diwali decorations

Related Posts

जळगाव

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

November 5, 2026
जळगाव

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

November 5, 2026
गुन्हे

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
जळगाव

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

November 5, 2026
जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026
Next Post

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा एक अटकेत ; दुसरा फरार

September 26, 2020

तरुणीची बलात्कार करून हत्या ; कुर्ल्यातील एचडीआयले कंपाउंडमध्ये सापडला मृतदेह

November 27, 2021

कोविन ॲप रजिस्ट्रेशन पोर्टलचा सर्व्हर डाऊन, नोंदणीदरम्यान तांत्रिक अडचणी

April 28, 2021

‘विकल्प’ची क्रीडा दिनाची संकल्पना खरोखरच अनोखी : ना. गुलाबराव पाटील

August 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group