TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर

बिगरकृषी’ ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी; उद्यापासून महावितरणची ‘अभय योजना’ २०२६-२७

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

जळगाव (प्रतिनिधी) – दिवाळीच्या शुभपर्वाचे औचित्य साधत महावितरणने मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी लघु व उच्चदाबाच्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित बिगरकृषी वीजग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. शुक्रवार (दि. ६ नोव्हेंबर) पासून ते १५ जानेवारी २०२७ पर्यंत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
थकबाकीमुक्तीसाठी घसघशीत सवलतींचा समावेश असणाऱ्या अभय योजनेअंतर्गत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. तर उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात आणखी २० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. यासह मागणीनुसार पुनर्जोडणी तात्काळ मिळणार आहे.
प्रकाशगड मुख्यालयात मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. ५) या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक श्री. धनंजय औंढेकर (संचालन), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. सचिन तालेवार (प्रकल्प), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) आदींची उपस्थिती होती.
दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत ज्या उच्च व लघुदाब वर्गवारीमधील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे असे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी (शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळून) ग्राहक तसेच दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक ‘अभय योजना २०२६-२७’ साठी पात्र आहेत. तसेच महावितरण डिस्ट्रीब्यूशन फ्रॅन्चाईजीमधील ग्राहकांनाही ही योजना लागू आहे.
या योजनेत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याजाची आणि विलंब आकाराची रक्कम १०० टक्के माफ करण्यात येईल. मूळ थकबाकीची रक्कम एकाच वेळी किंवा हप्त्यांनी भरण्याची ग्राहकांना सुविधा आहे. ही योजना सुरू झाल्यापासून १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’चा फायदा देण्यात येईल. यात लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना ३ वर्षांपर्यंत वीजजोडणी कायमस्वरूपी खंडित असल्यास १० टक्के तर ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कायमस्वरुपी खंडित असल्यास २० टक्के सवलत मिळेल. तसेच लघुदाब घरगुती व व्यावसायिक वगळून इतर सर्व लघु व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० टक्के व १५ टक्के सूट मिळेल. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाऊन पेमेंट भरून उर्वरित रकमेसाठी ६ समान व्याजमुक्त मासिक हप्ते तर उच्चदाब ग्राहकांना थकबाकीनुसार व्याजमुक्त ३ ते ६ हप्त्यांची सुविधा उपलब्ध असेल.
यासोबतच मंजूर भार २० किलोवॉटपर्यंत आहे अशा ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’चा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त ५ टक्के सवलत दिली जाईल. उल्लेखनीय म्हणजे या योजनेत सहभागी सर्व ग्राहकांसाठी पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत कृषी आणि सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळून इतर सर्व घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या १८३५ उच्चदाब आणि ३४ लाख ८४ हजार ५१३ लघुदाब अशा ३४ लाख ८६ हजार ग्राहकांकडे ७ हजार ६५० कोटी रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील २ हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्चदाबाच्या १९ आणि लघुदाबाच्या २ लाख ६० हजार ८१० अशा २ लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यात १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे संपूर्ण व्याज माफ होणार आहे.
‘अभय योजना २०२६-२७’ साठी अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. महावितरणच्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे ग्राहक अर्ज करू शकतील. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonVarious concessions announced for clearing outstanding dues on the auspicious occasion of Diwali

Related Posts

जळगाव

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

November 5, 2026
गुन्हे

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

November 5, 2026
जळगाव

दिवाळीच्या रोषणाईत विद्युत सुरक्षेकडे लक्ष द्या

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
जळगाव

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

November 5, 2026
जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोटात दुखते म्हणून आजीने नातीला नेले रुग्णालयात अन् बसला जबर धक्का !

December 24, 2021

पाकिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले ; दोन मेजरसह सहा जवान ठार !

September 26, 2022

हाडाखेडनजीक 16 लाखांचा पंजाबनिर्मित मद्यसाठा जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी !

December 19, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 फेब्रुवारी 2026 !

February 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group