TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते विशेष सेवा कक्षाचे उद्घाटन

vijay waghmare by vijay waghmare
September 24, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने वीजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारलेल्या या अभियानाच्या विशेष सेवा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांच्यासह महावितरणचे अधिकारी व विविध सौर पुरवठादार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी संचालक पवार यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ महावितरणच्या पात्र ग्राहकांना मिळवून देण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सेवा संकल्प अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ​आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या अंतर्गत जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी, योजनेचे आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कर्जाची सुविधा, अंदाजित खर्च यासाठी स्थानिक बँक प्रतिनिधी आणि निवडसूचीवरील सौर कंत्राटदार प्रतिनिधींशी थेट संपर्क व समन्वय करण्यात येत आहे. कर्जाची देखील सुविधा उपलब्ध होत आहे. यासह सौर योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच त्रुटींची पुर्तता करून प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे.
या सेवा सेतू अभियानात नवीन घरगुती वीजजोडणी देणे, नादुरुस्त रोहित्र विनाविलंब बदलून देणे, वीज बिलावरील नावात बदल करणे, मंजूर भार बदलणे, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचे निवारण तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीज यंत्रणेमध्ये आवश्यकतेनुसार स्पेसर बसवणे, इतर तांत्रिक उपाययोजना, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती आदींना वेग देण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. सेवा सेतू व सेवा संकल्प अभियानात एकाच छत्राखाली उपलब्ध सर्व सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
संचालकांकडून अभियानाचा आढावा
मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणकडून राबवण्यात येणाऱ्या या अभियानाच्या अंमलबजावणीचा संचालक धनंजय औंढेकर (संचालन) व राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला व हे अभियान आणखी गतीमान करण्याची सूचना केली. यावेळी कार्यकारी संचालक (मानव संसाधन) परेश भागवत यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली. बैठकीला कार्यकारी संचालक भुजंग खंदारे, अंकुर कावळे, सुनील काकडे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा यांच्यासह राज्यातील मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंते उपस्थित होते. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन उत्कृष्ट मंडलांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

 

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSeva Setu’ and ‘Seva Sankalp’ Campaign Launched for Electricity Consumers

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवा, मी परत येईल ; सराईत गुन्हेगाराकडून प्रांतधिकाऱ्यांना धमकी !

September 24, 2023

संतापजनक ! महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर गुप्तांगात घुसवला रॉड !

September 10, 2021

जैन हिल्स येथे क्रिकेट पंचांची कार्यशाळा

September 12, 2025

मोठी बातमी : दिशा सालीयनची हत्या कोणी केली, हे सांगणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा आमच्याकडे व्हिडिओ, पण सीबीआयलाच देणार – नितेश राणे (व्हिडीओ)

March 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group