TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

डोळ्यांच्या प्रकाशासाठी पनवेलकडे १०५ रुग्णांची वाटचाल : GPS मित्र परिवाराचा उपक्रम

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी/धरणगाव / जळगाव (प्रतिनिधी) – “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून समाजातील गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेच्या उपक्रमाचे आयोजन करताना मला खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान मिळते. कुणाच्यातरी जीवनात प्रकाश पेरण्याचा हा खरा दिव्य अनुभव आहे. गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला पुढे काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. जनतेच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहीन, असे स्पष्ट प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाळधी येथे GPS मित्र परिवार आणि भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर आयोजित केले होते. त्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी त्यांच्या उपस्थितीत पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी १०५ पात्र रुग्णांना सन्मानपूर्वक रवाना करण्यात आले. या उपक्रमात पनवेल येथील डॉ. सुदेश पाटील, डॉ. सुजय कोल्हापुरे , डॉ.अर्पिता जाधव, डॉ.प्रिया साळवी , चंदन चौधरी, प्रकाश पाटील आणि राहुल चौधरी यांच्या तज्ज्ञ टीमने ३०५ रुग्णांची तपासणी केली. त्यात १०५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या रुग्णांना लक्झरी आणि चारचाकी वाहनांतून पनवेल येथे रवाना करण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत आधुनिक पद्धतीने त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन होणार आहे. या शिबिराचे आयोजन मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील , विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली GPS ग्रुप व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत करण्यात आले. रुग्णांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचारांची संपूर्ण जबाबदारी GPS मित्र परिवाराने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे. हे कार्य केवळ सामाजिक नव्हे, तर मानवी मूल्यांची जपणूक करणारे आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले व त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रतापरव पाटील, सरपंच विजय पाटील, धनराज कासट, चंदन कळमकर, संजय महाजन, प्रशांत झवर, दिनेश कडूसे, अनिल माळी, दिलीप माळी, आबा माळी, नारायण आप्पा सोनवणे, बळीराम सपकाळे, मच्छिंद्र कोळी, प्रशांत पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

दरवर्षी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते ३ वेळा अशा नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करून शेकडो गरजूंना जीवनात नवा प्रकाश देणारे हे कार्य, जनतेच्या सेवेसाठी निःस्वार्थपणे झटणाऱ्या नेतृत्वाचे उदाहरण ठरते. या उपक्रमातून समाजात माणुसकी, दया आणि करुणेची नवी ऊर्जा पसरते. याचा जिवंत अनुभव आज पाळधीच्या भूमीत सर्वांनी घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 02 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार लताताई सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

May 28, 2023

सलमान खानसह वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2022

जिल्हा परिषदची गट-गण रचना आज होणार अंतिम

August 18, 2025

यावल तालुक्यातील वाळूमाफियावर एमपीडीतंर्गत कारवाई !

September 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group