जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ममुराबाद येथील शेलीनो एज्युकेशन सोसायटीचे अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी व नानासाहेब आर.जी.पाटील इन्स्टीटयूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर परीक्षा तसेच एम. फार्मसी जीपॅट परीक्षेत नुकतेच घवघवीत यश मिळवले आहे.
शेलीनो एज्युकेशन सोसायटीचे अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी व नानासाहेब आर.जी.पाटील इन्स्टीटयूट ऑफ फार्मसी ममुराबाद, जळगाव हे फार्मसी क्षेत्रातील एक धडाडीचे आणि फार्मसी क्षेत्रातील नामवंत महाविद्यालयापैकी एक महाविद्यालय आहे. सदर महाविद्यालयांची स्थापना सन २००५ साली झालेली असून या महाविद्यालयात बी. फार्मसी व डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी ६० जागा आहेत. महाविद्यालयाचे अध्यक्ष नानासाहेब श्री.आर.जी.पाटील व सचिव सौ. अरुणामाई आर पाटील यांच्या दूरदृष्टीकोनात व मार्गदर्शनात महाविद्यालयाची आजपर्यंत उत्तरोत्तर प्रगती सुरु आहे.
सदर महाविद्यालयात प्रशस्त प्रक्टीकल लॅब, क्लास रुम व सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. नुकत्याच झालेल्या सेमिस्टर परीक्षेमध्ये महाविद्यालयाचा निकाल हा ९७.०० टक्के लागला आहे. तसेच एम. फार्मसी जीपॅट परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या ३ विद्यार्थीनी गुणवत्ता यादीमध्ये उत्तीर्ण झालेले असून ही महाविद्यालयासाठी खरोखरच खूप अभिमानाची आणि यशाची बाब आहे.
विद्यार्थ्यांचे समर्पण, चिकाटी आणि शिकण्याची आवड यामुळे केवळ विद्यार्थ्यांचाच नाही तर संपूर्ण महाविद्यालयीन समुदायाला सम्मान मिळाला आहे. महाविद्यालयात अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यासाठी नेहमी कार्यरत आहेत. महाविद्यालयाची सर्वच स्तरावर दिवसेंदिवस प्रगती सुरु आहे. नानासाहेब आर.जी. पाटील व अरुणामाई आर. पाटील यांच्या नेतृत्वात आणि कुशल मार्गदर्शनात महाविद्यालय भविष्यात सुद्धा अशीच प्रगती आणि उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी वाटचाल करीत असून त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तर महाविद्यालयाची सर्व सुविधांनी युक्त इमारत, प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरण व सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, तसेच विद्यार्थी व पालकांचा वेळोवेळी पाठपुरावा यामुळेच हे शक्य होऊ शकले.