TheClearNews.Com
Wednesday, December 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारताची मान जगात उंचावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदिजींवर जनतेचा विश्वास असल्याने पुन्हा कमळ फुलणार : ना.गिरीश महाजन !

दलबदलू नेत्यांचे घराणेशाही पुढे लोटांगण चाळीसगावकरांना पटलेलं नाही : आमदार मंगेश चव्हाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पक्ष संघटनेत काम करत असताना अनेकांना संध्या द्याव्या लागतात तर अनेकदा थांबावे लागते. कामाचे मूल्यमापन करून पक्ष नवीन संधी व जबाबदाऱ्या देत असतो. हरिभाऊ जावळे, ए.टी.नाना, स्मिताताई वाघ यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्या जिल्ह्यातील देता येतील, त्यांना पुढे पक्षाने दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाने म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व आपल्याला मत देणाऱ्या जनतेची फसवणूक करणे आहे. त्यामुळे येणारा काही दिवसातच त्यांना त्यांची जागा कळेल. लोकांचा विश्वास मोदिजींवर आहे, त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे, त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. गेल्या १० वर्षात रेल्वे, हायवे, सिंचन सुविधा यात झालेला आमुलाग्र बदल जनते समोर आहे तसेच जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासून भाजपा व मोदिजींवर प्रेम करणारा असल्याने येथील सर्व स्तरावरील मतदार हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार चा नार सार्थ ठरवतील असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनी केले.

ते चाळीसगाव येथे भाजपा-शिवसेना–राष्ट्रवादी-रिपाई-रासप-रयत क्रांती महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते. भर दुपारच्या वेळी घेण्यात आलेल्या या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या एकत्रित असा हा पहिलाच मेळावा चाळीसगाव येथे यशस्वी संपन्न झाल्याने सर्वत्र उत्साह दिसत होता. सदर मेळाव्याला महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासह माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार साहेबरावजी घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजयदादा पवार, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

मद्याच्या नशेत मुलाकडून वृद्ध आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला

मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात

दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे यांचे वडील सुरेश साळुंखे तसेच आडगाव येथील बुथप्रमुख राजाराम हिरे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, स्मिताताई वाघ, एम.के.अण्णा पाटील साहेबराव घोडे, ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, पवनराजे सोनवणे, संजय पवार, अमोल शिंदे, आनंद खरात, जेष्ठ नेते सुरेश सोनवणे, सुनील निकम, संजय पाटील आदी महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जोरदार भाषणांच्या माध्यमातून उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केल.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, ही निवडणूक गल्लीची नाही तर दिल्लीची सत्ता कुणाच्या हातात असावी याची असल्याने जनता कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी व अबकी बार ४०० पार हा आकडा पार करण्यासाठी नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ या विक्रमी मताधिक्याने लोकसभेत जातील, त्यात योगदान म्हणून चाळीसगाव तालुक्यातून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्मिताताई यांना एक लाखांचे मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार यावेळी व्यक्त केला.

चाळीसगाव हा तालुका भाजपचा बालेकिल्ला आहे, या तालुक्याने अनेक नेतृत्व जिल्ह्याला, राज्याला दिले, पक्षात अनेक चढउतार आले तरी त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र ज्यांना अवघ्या १० वर्षात आमदारकी – खासदारकी मिळाली, जे ८ दिवसांपूर्वी पक्षाला आई म्हणत होते त्यांनी पक्षाने एक संधी नाकारताच आई सारख्या पक्षाशी बेईमानी केली. असे व्यक्ती कोणत्याही विचारधारेशी किंवा पक्षाशी एकनिष्ठ नसतात, उलट समाजासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी घातक असतात

जे बेलगंगा कारखाना विकणाऱ्यांच्या घरापुढे बेशरमाचे झाड लावणार होते, आज ते स्वार्थासाठी बेशरमासारखे त्यांच्याच घरी गेले. ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रस्थापित घराणेशाही विरोधात संघर्ष उभा केला. केसेस अंगावर घेतल्या, रात्रीचा दिवस एक केला त्याच घराणेशाहीच्या दारी यांनी लोटांगण घातले हे जनतेला अजिबात आवडलेलं नाही. त्यांना या वृत्तीचा किळस आलेला आहे. त्यामुळे अश्या प्रवृत्तीला गाडण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे.

गिरणा बलून बंधारे, नार पार नदीजोड च्या नावाने दिशाभूल केली जात आहे, गुजरात ला जाणारे पाणी अडवू नये म्हणून तिकीट कापले असा जावई शोध काही मंडळीना तिकीट कापल्यानंतर लागला. मात्र ज्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात हे गेले त्यांनी महाविकास आघाडी असताना २४ महिन्यात साधी बलून बंधाऱ्याना पर्यावरण मान्यता दिली नाही, मग याचं खरच गिरणा माय वर प्रेम आहे का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

गिरणा बलून बंधाऱ्याना पहिली प्रशासकीय मान्यता गिरीशभाऊ जलसंपदा मंत्री असताना २८ / १२ / २०१८ रोजी देण्यात आली.
७० वर्षात नार – पार – गिरणा नदीजोड प्रकल्पाचे साधे अंदाजपत्रक सुद्धा कुठल्या सरकारने केल नव्हत ते अंदाजपत्रक तयार करण्यासाठी ६ एप्रिल २०१८ म्हणजे बरोबर आजच्या ६ वर्षांपूर्वी तो ऐतिहासिक शासन निर्णय घेतला. वरखेडे धरणाला केंद्राच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत गिरीशभाऊ मुळे समावेश झाला, ५०० कोटी निधी मिळून ५ वर्षात काम पूर्ण झाल. मात्र जे याच मी केल मी केल म्हणून श्रेय घेतात त्यांना ५ वर्षात साधा तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवता आला नाही, नाहीतर आज गिरणेवर पाणी अडले असते.

हि सर्व सिंचनाची प्रकल्प केवळ केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीनेच होऊ शकतात त्यामुळे त्यामुळे जळगाव जिल्ह्यालाच नव्हे तर खान्देशाला सिंचन सुब्बत्ता आणण्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमताने निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठेही गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने व एकनिष्ठपणे १३ मे मतदानाच्या दिवसापर्यंत झोकून देऊन काम करण्याचे आवाहन यावेळी आमदार चव्हाण यांनी केल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मद्याच्या नशेत मुलाकडून वृद्ध आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला

December 24, 2025
जळगाव

मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात

December 23, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

December 22, 2025
जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
चाळीसगाव

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

December 21, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
Next Post

चोपड्यात मतदान जनजागृती संदर्भात मुख्याध्यापकांची बैठक उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केवळ घटना दुरुस्ती करून ओबीसींची शुद्ध फसवणूक : शरद पवार

August 16, 2021

दिल्लीत ऑक्सिजनअभावी डॉक्टरसहित ८ रुग्णांचा मृत्यू

May 1, 2021

राकेश टिकैत यांच्यावर बंगळुरूत शाईफेक ; पत्रकार परिषदेत मोठा राडा

May 30, 2022

जिल्ह्यात आज आढळले १९१ कोरोनाबाधित, ४६४ झाले बरे !

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group