जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले असून आज प्रगती पॅनलची सहविचार सभा उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकीसाठी प्रगती गट अध्यक्षपदी संस्थापक सदस्य डॉ. रवींद्र साळूंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आजच्या बैठकीला प्रगती गटाचे चार संस्थापक सद्यस्यांपैकी तीन सदस्य अशोक श्रावण पाटील, प्रभाकरअप्पा गोविंदा सोनवणे, डॉ. रवींद्र साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशी असेल कोअर कमिटी
डॉ. रविंद्र साळुंखे (अध्यक्ष), प्रभाकर आप्पा सोनवणे (संस्थापक), राजेंद्र रामसिंग पाटील, बी. टी.बाविस्कर, अ. वा.जाधव, सुशील साळुंखे, योगेश नन्नावरे (सचिव), सुभाष मराठे (प्रसिद्धी प्रमुख), सलीम तडवी (प्रसिद्धी प्रमुख).
यावेळी संस्थापक सदस्यांनी नवीन अध्यक्षांची निवड केली. तसेच आगामी निवडणूक करिता कोअर कमेटी गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करून उमेदवार जाहीर करतील. प्रगती गटाकडून ग.स. निवडणुक संपूर्ण ताकदिने लढणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आला आहे.