TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

मनपाच्या प्रशासकीय निर्णयांवर पारदर्शकता आवश्यक - वैशाली पाटील

vijay waghmare by vijay waghmare
March 5, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेत लागू असलेल्या प्रशासकीय राजवटीत घेतलेल्या निर्णयांबाबत पारदर्शकता ठेवावी आणि त्या कालावधीतील सर्व आर्थिक व विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, अशी मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी केली आहे. प्रशासकीय कालावधीत नेमके कोणते आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्यात आले, निधीचा वापर कसा झाला तसेच विकासकामांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध करावी, असे निवेदन त्यांनी बुधवारी मनपा आयुक्तांकडे दिले आहे.

आयुक्तांकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, जळगाव महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर लागू करण्यात आलेल्या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासकीय पातळीवर चालविण्यात आला. सदर कालावधीत विविध प्रशासकीय, आर्थिक, धोरणात्मक व विकासकामांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले असल्याची माहिती उपलब्ध आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार हा लोकशाही तत्त्वांवर आधारित असून जनतेच्या निधीचा उपयोग, त्यावरील निर्णयप्रक्रिया व अंमलबजावणी ही पूर्णपणे पारदर्शक, उत्तरदायी व नोंदवहीत अधोरेखित असणे अत्यावश्यक आहे.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

सदर प्रशासकीय कालावधीत महानगरपालिकेचा एकूण मंजूर अर्थसंकल्प, प्रत्यक्ष झालेला खर्च, महसूल वसुलीची स्थिती, राज्य व केंद्र शासन अनुदानाचा वापर, कर्ज व्यवहार, तसेच प्रलंबित देयके यांचा सुस्पष्ट व लेखापरीक्षित तपशील जनतेसमोर येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्या कालावधीत प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता देण्यात आलेली विकासकामे, त्यांची अंदाजित किंमत, टेंडर प्रक्रिया, निविदा अटी, कंत्राटदार निवड, कामांची सद्यस्थिती व वेळवाढीची कारणे यांचा अधिकृत व सुसंगत आढावा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

तसेच, सदर कालावधीत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा, विकास आराखड्यातील बदल, करदर वाढ अथवा नवीन करनिर्धारण, सार्वजनिक- खाजगी भागीदारीतील निर्णय, मनुष्यबळ भरती किंवा कंत्राटी नियुक्तत्या, तसेच न्यायालयीन प्रकरणे व आर्थिक दायित्वे यासंबंधी घेतलेल्या निर्णयांचा वस्तुनिष्ठ व दस्तऐवजीकरण केलेला आढावा नागरिकांना समजणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या निधीचा वापर हा जनतेच्या कररुपी योगदानातून होत असल्यामुळे त्याचा संपूर्ण लेखाजोखा नागरिकांसमोर ठेवणे ही प्रशासनाची वैधानिक व नैतिक जबाबदारी आहे.

लोकशाही पद्धतीमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत घेतलेले निर्णय, त्यामागील कारणमीमांसा व त्यांचे दीर्घकालीन परिणाम याबाबत स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पुढील कालावधीत धोरणात्मक सातत्य राखता येईल यासाठी प्रशासकीय राजवटीच्या संपूर्ण कालावधीचा सविस्तर, तध्याधारित व लेखापरीक्षणास अधीन असा अधिकृत श्वेतपत्रिका अहवाल तयार करून तो महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व सार्वजनिक माध्यमातून प्रसिद्ध करण्यात यावा, ही नम्र परंतु ठाम विनंती आहे.

मनपाच्या प्रशासकीय निर्णयांवर पारदर्शकता आवश्यक – नगरसेविका वैशाली पाटील
श्वेतपत्रिकेमध्ये आर्थिक, तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर सर्व पैलूंचा समावेश करून पारदर्शकतेचे उच्चतम निकष पाळले जावेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुदृढ प्रशासनासाठी व नागरिकांचा विश्वास दृढ करण्यासाठी ही बाब अत्यंत आवश्यक व समयोचित आहे. आपण या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, असे देखील वैशाली पाटील म्हंटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonVaishali Patil demands that the accounts of the administrative regime be published through a white paper.

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 06 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तोफखाना केंद्र नाशिक येथे १०७ जागांसाठी भरती ; जाणून घ्या.. शैक्षणिक पात्रता आणि कसा करायचा अर्ज !

December 28, 2021

ट्रान्सफॉर्मर वरील ॲल्युमिनियमचे ११ span तार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 29, 2022

‘आमचे संविधान, आमचा स्वाभिमान’ एक चळवळ व्हावी : जयसिंग वाघ !

November 21, 2022

लग्न लावून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

November 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group