जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नंदुरबार निरीक्षक प्रा. मिनाक्षी रमेश चव्हाण यांनी सिंगल वुमन फाउंडेशनची स्थापना केली. सिंगल वुमनसाठी कार्यरत राहणाऱ्या या फाउंडेशच्या संस्थापक अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी चव्हाण आहेत.
या फाउंडेशनच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षा प्रा. मंगला शिंदे, सचिव चेतना पाटील, सदस्या वंदना पाटील, सगुणा पाटील, मेघना देसाई, रेखा पाटील, वंदना मधुकर पाटील, संदिपा वाघ यांचा समावेश आहे. कोरोनाच्या कालावधीत पितु्छत्र हरवलेल्या एका गरजू विद्यार्थिनाच्या शिक्षणासाठी या फाउंडेशनतर्फे आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. ही मदत प्रा. चव्हाण यांनी त्यांचे पती, जिल्हा बँकेचे सेवानिवु्त्त सरव्यवस्थापक रमेश चव्हाण यांच्या स्मरणार्थ दिली.