TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

स्कूलचे यंदाही १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण

vijay waghmare by vijay waghmare
May 13, 2025
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही १०० टक्के निकाल लागला. सर्वच्या सर्व विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

मोहित गजानन पाटील, प्रेम विनोद पावसे हे दोघं प्रथम (९२.००%), जान्हवी प्रदीप सोनवणे, रिया एकनाथ नेमाडे दोघंही-द्वितीय (९१.६० %) व मिताली सुकलाल नाथ, घोषिता जयंत पाटिल दोघंही – तृतीय (९१.००%), भावेश विकास गरूड – चतुर्थ (९०.८०%), धिरज विकास पाटील – पाचवा (९०.६०) उत्तीर्ण झालेत. गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी अभिनंदन केले.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

१६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. १० विद्यार्थी ९० टक्केच्या वर गुणप्राप्त केले. तर उर्वरीत विद्यार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती असतानाही चिकाटीने अभ्यास करून यश प्राप्त केल्याने अनुभूतीच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतूक आहे. स्कूलच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत सातत्याने शाळेचा १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राखल्याने शिक्षकांसह सहकाऱ्यांचेही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.

आईच्या खडतर प्रवासाला स्कूलमधून पहिला येऊन मोहितने दिला आनंद
वडीलांचे कोरोनामुळे निधन झाले आई शिवणकाम करून संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाहाची व्यवस्था करते. आजोबा साथीला आहेच मात्र बहिण भार्गवी सह कुटुंबाचा गाडा पुढे नेताना आई-आजोबांना तारेवरची कसरत करावी लागते. आता आई शिवणकामासह आशा वर्करचे काम करते. दोघांच्या खडतर प्रवासाची जाणिव असून अनुभूती स्कूलमधून प्रथम आल्याने त्यांना आनंदाची अनुभूती देता आली हेच माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. अशी प्रतिक्रिया पहिला आलेला मोहित पाटील ने दिली.

अंध फिजिओथेरपिस्टच्या मुलीचे अधिकारी होण्याचे स्वप्न
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल मुळे आमचे कार्यसिद्धीस झाले अशी प्रतिक्रिया अंध फिजिओथेरपी करणाऱ्या जयंत पाटील यांची आहे. आपल्या कन्येने मिळविलेल्या यशाबद्दल आम्ही आनंद आहेच, समाजातील वंचित गरजू घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना घडविण्याचे काम भवरलाल जैन यांनी केले तेच काम अशोकभाऊ पुढे घेऊन जात आहे. तृतीय आलेल्या कु. घोषिता पाटील चे स्वप्न स्पर्धा परिक्षा देऊन मोठं अधिकारी होण्याचं आहे. दहावीत शिक्षकांनी विशेष क्लास घेऊन अभ्यास घेतला त्यामुळे आम्हाला यशस्वी होता आले, अशी प्रतिक्रीया घोषिता ने दिली.

स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या रिया चे वडीलांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. अशा प्रकारे परिस्थितीशी दोन हात करून अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAsha worker's son first in Anubhuti English Medium School

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 14 मे 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा नगरपरिषद गाळ्यांचा लिलाव पुढे ढकला – सचिन सोमवंशी यांची मागणी

November 3, 2020

महिलांनी आर्थिक उन्नतीसाठी उमेद अभियानात सहभागी व्हावे : सौ. संपदा उन्मेशदादा पाटील

August 12, 2021

Gold Price Today : सोन्याचा दरात वाढ ; जाणून घ्या..सोन्या चांदीचा लेटेस्ट दर

May 20, 2022

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; तूर्त राठोडांच्या राजीनाम्याबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही : ना. गुलाबराव पाटील

February 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group